सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी दाखल झालेल्या वीस उमेदवारी अर्जांपैकी सात उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने चार जागांसाठी मंगळवारी छाननी प्रक्रियेदरम्यान तेरा उमेदवारी अर्ज पात्र ठरल्याने चार जागांसाठी तेरा उमेदवार रिंगणात राहिले आहे.यामध्ये एक अपक्षाचा समावेश आहे.त्यामुळे चार जागांसाठी आता तेरा उमेदवारांची लढत रंगली असून बुधवार पासून होणाऱ्या माघारी नंतर दि .१० पर्यंत माघारीची प्रक्रिया असल्याने दहा जानेवारी नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.त्यामुळे सध्या तरी तिरंगी लढतीत अपक्ष महिला उमेदवाराचा रिंगणात समावेश आहे.
सोयगाव नगरपंचायतसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते मंगळवारी निवडणूक विभागाने घेतलेल्या छाननीत तब्बल सात उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने तेरा नामनिर्देशनपत्र पात्र ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे यांनी दिली.यामध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा प्रत्येकी एक अर्ज अपात्र झाला असून शिवसेनेचे दोन तर भाजपाचा एक याप्रमाणे अपात्र ठरला असून प्रभाग क्रमांक चौदा मध्ये शिवसेनेचे दोन अर्ज अपात्र ठरले आहे.त्यामुळे आता शिवसेना-भाजपा-आणि आघाडी यांच्यात तिरंगी लढत रंगली असून यामध्ये प्रभाग क्रमांक चौदा साठी महिला उमेदवाराचा अपक्ष उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे.निवडणूक निर्णय अधिकारी संजय मोरे,तहसीलदार रमेश जसवंत,मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी,नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,यांनी छाननी प्रक्रिया हाती घेतली होती.