आमदार मंगेश चव्हाण यांची भाऊबीज सोहळ्यात घोषणा,
“दादा, तुमच्याकडे पाहून हिम्मत येते” भावाने दिलेली भाऊबीज पाहून बहिणी ही गहिवरल्या
चाळीसगांव – दि.१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― अतिशय प्रतिकूल परिस्थितीत व तुटपुंज्या मानधनात ग्रामीण व शहरी भागात आशा सेविका, अंगणवाडी ताई, मदतनीस या समाजातील शेवटच्या घटकाला सेवा देत असतात. सर्व सेविका ताई ह्या सर्वसामान्य कुटुंबातील असतात त्यातही अनेक विधवा, परित्यक्त्या, निराधार असतात, त्यांचा भाऊ म्हणून जबाबदारी स्वीकारत असतांना गेल्या वर्षभरात अनेक बहिणींच्या अडचणी जाणून घेता आल्या. शासन त्यांचे मानधन वाढवेल तेव्हा वाढवेल त्यासाठी आमदार म्हणून पाठपुरावा करेन मात्र भाऊ म्हणून माझी देखील काही देणे आहे ह्या भावनेने चाळीसगांव तालुक्यातील सर्व आशा सेविका, अंगणवाडी ताई, मदतनिस यांच्या एका मुलीच्या लग्नासाठी आता या वर्षांपासून २५ हजार रुपयांची मदत करेन व त्या भाचीची मामा म्हणून जबाबदारी पार पाडेल अशी घोषणा चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली, ते शिवनेरी फाउंडेशन तर्फे आयोजित आशा-अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा भाऊबीज सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
चाळीसगांव शहरातील वैभव मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्याला चाळीसगांव तालुक्यातील १३०० हुन अधिक आशा – अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या तर मंचावर
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते चंद्रात्रे बाबा, वाघळी येथील अविनाश सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव बापू पाटील, प्रा ए ओ पाटील सर, माजी पंचायत समिती उपसभापती सतीश पाटे, जेष्ठ नगरसेवक राजू अण्णा चौधरी, जि प सदस्या सौ.मंगलाताई भाऊसाहेब जाधव, सौ.मोहिनीताई अनिल गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, नगरपालिका गटनेते संजय आबा पाटील, पंचायत समिती गटनेते संजय तात्या पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सरदारशेठ राजपूत, माजी संचालक विश्वजित पाटील, पत्रकार एम बी मामा पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब राऊत, माजी सभापती सौ. स्मितलताई दिनेश बोरसे, नगरसेवक नितीन पाटील, सोमसिंगआबा राजपूत, रिपाई जिल्हाध्यक्ष आनंद खरात, नगरसेविका सौ.विजयाताई प्रकाश पवार, सौ.विजयाताई भिकन पवार, सौ.संगीताताई गवळी, नगरसेवक बाळासाहेब मोरे, चिराग शेख, चंद्रकांत तायडे, भास्कर पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख अनिल नागरे, माजी पंचायत समिती सदस्य संभाजी राजे पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष वाय आर सर, सामाजिक कार्यकर्ते सदानंद चौधरी, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. प्रभावती महाजन, नगराज महाजन, वाघडू येथील आबा पाटील पोलीस, जेष्ठ कार्यकर्त्या नमोताई राठोड, अल्पसंख्याक महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रिजवाना ताई खान, शिवनेरी फाउंडेशनच्या सौ.योजनाताई धनंजय चव्हाण, युवा मोर्चाचे भावेश कोठावदे, सुनील पवार, आशा गट समन्वयक सौ.मीनाताई चौधरी, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस योगेश खंडेलवाल, जितेंद्र वाघ, कैलास नाना पाटील ,रत्नाकर पाटील, राम पाटील आदी उपस्थित होते.
आमदार चव्हाण यांनी मनोगतात पुढे सांगितले की, कुठलंही नातं जोडायचे तर ते प्रामाणिकपणे जपायचे हा माझा स्वभाव आहे, मागील वर्षी भाऊबीज सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्यातील आशा – अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी आरोग्य सेविकांचा सत्कार केला व त्यांना प्रेमाची भेट म्हणून साडी व मिठाई दिली तेव्हाच जाहीर केले होते की, हा कार्यक्रम मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन दरवर्षी घेत जाईल, यावर्षी काही कारणांमुळे उशिर जरी झाला असला तरी पुढच्या वर्षी मात्र दिवाळी भाऊबीज नंतर ४ ते ५ दिवसात हा कार्यक्रम घेतला जाईल असे देखील त्यांनी जाहीर केले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या मनोगतानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आमदार चव्हाण यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली गेली, यावेळी शिवनेरी फाउंडेशन च्या वतीने सर्व आशा-अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना साडी भेट देण्यात आली, आपल्या लाडक्या भाऊ, भावजयी सोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वांची एकच झुंबड उडाल्याचे यावेळी पाहण्यात आले.
*”दादा, तुमच्याकडे पाहून हिम्मत येते” भावाने दिलेली भाऊबीज पाहून बहिणी ही गहिवरल्या…*
मान्यवरांची मनोगते झाल्यानंतर आशा सेविका गायत्री जाधव व उंबरखेड phc येथील आशा सेविका भारती रविंद्र पाटील यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या, “दादा आम्हाला भाषण करण्याची सवय नाही मात्र तुमच्याकडे पाहून आम्हाला हिम्मत येते, तुमच्यासारख्या भावाचा पाठिंबा असल्याने काम करतांना कितीही अडचणी येत असल्या, मानसन्मान मिळत नसला तरी आम्ही ते करतो, आशा जाधव यांनी सांगितले की कोरोना काळात माझ्या गावातील एका पेशंट जवळ त्याच्या घरातील सासू, सासरे, नवरा, मुले कुणीही थांबायला तयार नसताना मी माझी दोन लहान मुले घरात सोडून सरकारी दवाखान्यात ४ दिवस थांबले, आम्ही कधीही कामाचा कंटाळा केला नसल्याचे सांगितले तर भारती रविंद्र पाटील म्हणाल्या की, आमदार मंगेशदादांचा रूपाने आम्हाला भाऊ नाही तर विचार, भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ मिळाले आहे अश्या भावना व्यक्त केल्या.
आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत म्हणून सर्व आशा सेविका यांनी आपली आशा टाळी वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
योगाचार्य वसंतराव चंदात्रे, अविनाश सुर्यवंशी, संजय रतनसिंग पाटील, संजय भास्करराव पाटील, घृष्णेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, संगीता गवळी, योजना पाटील, प्रभावती महाजन, आबा पाटील, मीनाताई चौधरी यांनी मनोगताच्या माध्यमातून संवाद साधला.
पृथ्वीतलावर निर्मितीची शक्ती फक्त मातीला आणि मातेला असून या सोहळ्याच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा गौरव होत असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले तसेच भावाचे बहिणीवर प्रेम असतेच मात्र मंगेश दादांचा सौभाग्यवती प्रतिभाताई चव्हाण यांनी नणंद म्हणून शिवनेरी फाउंडेशन च्या माध्यमातून तालुक्यातील हजारो भाऊजायींची भाऊबीज साजरी करून एक वेगळा आदर्श स्थापित केला असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कामिनीताई सुनील अमृतकर यांनी केले, प्रास्ताविक अमोल नानकर यांनी केले तर आभार अमोल चव्हाण यांनी मानले.
यावेळी योगायोगाने १ जानेवारी रोजी शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.