जामखेड: जामखेड शहरातून जाणाऱ्या नगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिलीप तारडे उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय अहमदनगर यांच्याकडे वेळोवेळी केली होती यासाठी त्यांनी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या नगर व बीड कार्यालयाशी सातत्याने पुरावा केला होता जामखेड ते नगर व जामखेड ते बीड या मार्गाला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याचे रुंदीकरण व दर्जेदार डाबरीकरण होईल ही अशा जामखेड करांना होती मात्र आज असा दर्जा मिळूनही या रस्त्याच्या कामाची दैनंदिन दयनीय अवस्था झाली जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्या नंतरही सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले होते वर्षापासून याबाबत वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते परिणामी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता जामखेड हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याने या ठिकाणावरून वाहनाचे सर्वाधिक दळणवळण असते त्यातच पावसामुळे या मार्गावरील खड्डे वाहून ते आता एक दोन फुटांपर्यंत खोल झाले आहेत अशा खड्ड्यांमुळे वेगात जाणाऱ्या मोटरसायकल या ठिकाणी पडून अनेकांचे अपघात झाले असून काही जणांना जीव गमवावा लागला आहे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याकडे संबंधित राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे लक्ष वेधण्याचे काम कोठारी यांनी केले
संजय कोठारी यांनी उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय अहमदनगर दिलीप तारडे यांच्याशी संपर्क साधून रस्त्याच्या कामाला यश मिळवले आहे