सोयगाव,दि.१९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव नगरपंचायतीच्या १७ जागांच्या निवडणुकीत बुधवारी घोषित झालेल्या निकालात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून अकरा जागांवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे तर प्रतिस्पर्धी भाजपाला सहा जागांवर विजय मिळविता आलेला असल्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना रावसाहेब दानवेला महसूल राज्यमंत्र्यां अब्दुल सत्तार यांनी दे धक्का देवून सोयगाव नगरपंचायतीवर बहुमत सिद्ध केले आहे,शिवसेनेकडे १७ पैकी ११ जागा राहिल्या असून नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सोयगावात शिवसेनेची विजयी शृंखला कायम राहिली आहे.विधानसभा निवडणूक ते नगरपंचायत निवडणुकीपर्यंत शिवसेनेने विजयाची परंपरा कायम ठेवली असल्याने भाजपाला चिंतन करण्याची वेळ आलेली आहे.
सोयगाव नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील १३ आणि दुसर्या टप्प्यातील ४ याप्रमाणे १७ जागांच्या निवडणूक निकाल बुधवारी जाहीर झाला यामध्ये वार्ड क्र-एक पासून शिवसेनेने विजय मिळवीत अखेरीस वार्ड क्र-पाच मध्ये तिसऱ्या फेरीला भाजपाचं पहिल्या उमेदवाराचा विजय झाला होता.त्यामुळे मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये शिवसेनेने निर्विवाद विजय मिळवीत विजयाची सुरुवात केली होती.भाजपाकडे १७ पैकी सहा तर शिवसेनेकडे ११ जागा राहिल्या असल्याने शिवसेनेला नगरपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला मात्र खातेही उघडता आलेले नसल्याने आघाडीच्या १५ उमेदवारांना मतदारांनी घराचा रस्ता दाखविला असून प्रहारचे एकमेव उमेदवार असलेल्या कृष्णा जुनघरे यांचा पराभव झालेला आहे.आघाडीच्या १५ पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस चार आणि कॉंग्रेस-पाच अशा नऊ उमेदवारांना दुहेरी मतदान संख्या गाठता आलेली नाही.पहिल्यांदाच सोयगावात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची नगरपंचायत साठी झालेल्या आघाडीला पराभव पत्करावा लागलेला आहे.
शिवसेनेचा जल्लोष-
शिवसेनेकडे सतरा पैकी ११ जागा मिळाल्याने मतमोजणीच्या मैदानापासून ते थेट शिवसेना कार्यालयापर्यंत शिवसेनेचा जल्लोष सुरु झाला होता.पहिल्याच जागेवर विजय मिळाल्यावर शिवसेनेकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली होती.
——–राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचाही जल्लोष—-
शिवसेनेला अकरा जागांवर यश मिळाल्यावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोयगावात दाखल होवून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सोबत जल्लोष करून कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू राठोड,तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांना खांद्यावर घेत जल्लोष केला.
—— सोयगाव नगरपंचायत विजयी व पराभूत उमेदवार—-
वॉर्ड क्र: ०१
शाहिस्ताबी रउफ,शिवसेना ( विजयी )
मते : २९७
कल्पना कैलास, भाजप ( पराभूत )
मते : १८२
वॉर्ड क्र: ०२
अक्षय काळे, शिवसेना ( विजय )
मते : १९९
प्रमोद पाटील, भाजप ( पराभूत )
मते : १९३
वॉर्ड क्र. ०३
दीपक पगारे, शिवसेना ( विजय )
मते : १५३
बनकर वसंत,भाजप ( पराभूत )
मते : ९५
वॉर्ड क्र. ०४
हर्षल काळे, शिवसेना ( विजय )
मते : १८४
काळे संदीप, भाजप ( पराभूत )
मते : १०२
वॉर्ड क्र. ०५
वर्षा घनघाव,भाजप ( विजयी )
मते : १३७
छायाबाई काळे, राष्ट्रवादी ( पराभूत )
मते : १२४
वॉर्ड क्र. ०६
संध्या मापारी,शिवसेना ( विजयी )
मते : १००
मनगटे संगीता, भाजप ( पराभव )
मते : ९३
वॉर्ड क्र. ०७
सविता जावळे, भाजप ( विजयी )
मते : ११६
चौधरी मनीषा, शिवसेना ( पराभूत )
मते : १०७
वॉर्ड क्र. ०८
कुसुम दुतोंडे, शिवसेना ( विजयी )
मते : २१०
पाटील शारदाबाई, भाजप ( पराभूत )
मते : ५९
वॉर्ड क्र. ०९
सुरेखा काळे,शिवसेना ( विजयी )
मते: १४०
मिसाळ विनोद, भाजप ( पराभूत )
मते : १२४
वॉर्ड क्र. १०
संतोष बोडखे,शिवसेना ( विजयी )
मते : १६२
युवराज आगे, भाजप ( पराभूत )
मते : ८०
वॉर्ड क्र. ११
संदीप सुरडकर,भाजप ( विजयी )
मते : १२२
बावस्कर शामराव रामा, शिवसेना ( पराभूत )
मते : ८९
वॉर्ड क्र. १२भगवान जोहरे,शिवसेना ( विजयी )
मते : १९३
पाटील योगेश, भाजप ( पराभूत )
मते : ९३
वॉर्ड क्र. १३
ममता बाई इंगळे, भाजप ( विजयी )
मते : ९१
सपकाळ सुवर्णा, शिवसेना ( पराभूत )
मते : ८३
वॉर्ड क्र. १४
आशियाना कदिर शहा, भाजप ( विजयी )
मते : १३४
चौधरी मनीषा शाम शिवसेना ( पराभूत )
मते : ६२
वॉर्ड क्र. १५
सुलताना रौफ देशमुख,भाजप ( विजयी )
मते : २०३
शहा परवीनबानो, शिवसेना ( पराभूत )
मते : २००
वॉर्ड क्र. १६
गजानन कुडके, शिवसेना ( विजयी )
मते : १९१
मोरे संजय, भाजप ( पराभूत)
मते: १२६
वॉर्ड क्र. १७
आशाबी अश्रफ तडवी, शिवसेना ( विजयी )
मते : १३७
सोनवणे कविता,भाजप ( पराभूत )
मते : ११३
याप्रमाणे विजयी व पराभूत उमेदवार आहेत…