महाराष्ट्र राज्य

निर्भय मतदानासाठी मतदारांत विश्वास निर्माण करा- विनोदसिंग गुंजियाल

अकोट दि.०२: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक निरीक्षक विनोदसिंग गुंजियाल (आयएएस) यांनी ३० मार्च रोजी अकोट मतदारसंघाला भेट देऊन भौतिक सुविधा व दुर्गम भागातील मतदारांशी चर्चा केली. निर्भय मतदानासाठी मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा, अशा त्यांनी संबंधित निवडणूक विभागाला दिल्यात. निवडणूक विभागाच्या तयारीचा कार्यालयीन आढावा याप्रसंगी घेण्यात आला. मुख्य निरीक्षकांनी अकोट शहर व इतर ग्रामीण भागातील संवेदनशील १२ व अतिसंवेदनशील ५ मतदार केंद्राची पाहणी केली. विशेषतः आदिवासी क्षेत्रातील मतदारांशी संवाद साधत शहापुर या दुर्गम भागातील ग्रामस्थ व मतदारांशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या. दिव्यांग मतदारांच्या सुविधांचा आढावा घेत निवडणूक विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी अकोटचे तहसीलदार अशोकराव गिते, तेल्हाराचे तहसीलदार संतोष येवलीकर, नायब तहसीलदार राजेश गुरव, पर्यवेक्षक संजय तळोकार, विशाल शेरेकर यांच्या सह मतदार केंद्राचे बीएलऔ उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    अकोट येथील शिवाजी महाविद्यालयातील मतदार केंद्र क्रमांक १४५ या मतदान केंद्रावर महिलांचे व्यवस्थापन असनार आहे. मतदार केंद्रावर तैनात पोलिसांपासून तर केंद्राध्यक्ष आणि मतदार अधिकारी यांच्या सह सर्व कर्मचारी महिलाच असतील. आवडीनुसार महिला कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. हे विशेष मतदार केंद्र म्हणून ओळखले जाणार,अशी माहिती तहसीलदार कार्यालयातून प्राप्त झाली.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.