ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

सोयगाव एकात्मिक प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर ,सकाळी उघडतात आणि सायंकाळी बंद करतात ;अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने कार्यालय उघडण्यापुरतेच

सोयगाव,दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालय केवळ उघडण्यासाठी व बंद करण्यासाठीच उरले असून या कार्यालयातील कारभार अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने वाऱ्यावर आहे.सोयगाव एकात्मिक कार्यालयात कर्मचारीच नाही उपलब्ध कर्मचारी हजर राहत नाही त्यामुळे या कार्यालयाला केवळ उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी वेतनावर कर्मचारी असल्याचे बोलले जात आहे.एकात्मिक प्रकल्प कार्यालयाला सिल्लोड येथील प्रभारी प्रकल्प अधिकारी देण्यात आलेला आहे परंतु हे अधिकारी महिन्यातून एकदाच हजर होतात तर पर्यवेक्षिकाही प्रकल्प अधिकारी येणार असल्यावरच कार्यालयात हजर होतात त्यामुळे कार्यालयात इतर दिवस कोणीही राहत नसल्याने सोयगाव तालुक्यात एकात्मिक कार्यालयाचा कारभार वाऱ्यावर आहे.

सोयगाव तालुक्यात असलेल्या अंगणवाड्या आणि मिनी अंगणवाड्याचा कारभार नियंत्रित करणारे एकात्मिक प्रकल्प कार्यालय आहे मात्र या कार्यालयात एक नव्हे तर दोन दोन लिपिक कर्मचारी देण्यात आलेले असूनही एकही लिपिक संवर्गातील कर्मचारी हजर राहत नसल्याने एक कर्मचारी बुलढाण्यात तर दुसरा एक पाचोरा येथे राहतो त्यामुळे अंगणवाडी सेविकंना शासकीय कागदपत्रासाठी मोठी तारांबळ होत असून या कार्यालयाचे दरवाजे सकाळी उघडण्यात येवून सायंकाळी बंद करण्यात येतात.

पाच वर्षापासून प्रभारी प्रकल्प अधिकारी——

सोयगाव येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयाला तब्बल पाच वर्षापासून प्रभारी प्रकल्प अधिकारी देण्यात आलेला असून कायान्स्वरूपी प्रकल्प अधिकारी नसल्याने सोयगाव तालुक्यात एकात्मिक प्रकल्प विभागाचा कारभारला ढील देण्यात आलेली आहे.या कार्यालातील कर्मचारी जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभागाने केवळ वेतनासाठी नियुक्त केले आहे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

बारा वर्षापासून शासकीय वाहन धूळखात उभे—

एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाचे शासकीय वाहन तब्बल बारा वर्षापासून धूळखात पडून उभे असून जिल्हा परिषदेकडून या वाहनाची साधी देखभालही करण्यात येत नसल्याने वाहन उभे राहून भंगार अवस्थेत भग्नावस्थेत झालेले आहे.या वाहनाच्या आतील भागाचे अवशेष भग्न झाले असूनही या वाहनाचा विचार करण्यात आलेला नाही.

Back to top button