बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

कुटुंबवत्सल मंजुळाबाई (काकू) वामनराव पवार पाटील यांचे निधन

बीड-(प्रतिनिधी): शिरूर येथील सुतारनेट भागातील जुन्या पिढीतील जाणते मातृवत्सल व्यक्तिमत्व मंजुळाबाई (काकू) वामनराव पवार पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्याची दुःखद वार्ता कळताच पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण पसरले. ‘मायेचा आधार’ गेल्याची भावना परिसरातील लोक व्यक्त करत होते.त्या राहुल मोरे यांच्या आजी होत्या.

‘काकू’ या नावाने सर्वांची लाडक्या असलेल्या मंजुळाबाई वामनराव पवार यांनी अत्यंत कष्टातून व संघर्षातून संसार उभा करत मुले घडवली. स्वतः निरक्षर असून शिक्षणाचे मोल वेळीच जानत आपल्या मुलांना घडविण्याचे कार्य त्यांनी केले, त्यांच्या या संस्कारातून आज त्यांचे पांडुरंग वामनराव पवार , गहीनाथ वामनराव पवार आरोग्य विभागात तर बापू वामनराव पवार तलाठी या पदावर कार्यरत आहेत. येणाऱ्या प्रत्येकासाठी त्या मायेचा सागर होत्या. त्यांवर धार्मिक व आध्यात्मिक प्रभाव होता. अत्यंत प्रेमळ,संयमी व मानवतेचा झरा त्या होत्या.प्रत्येक येणारा माणूस आपला व त्यासाठी काही तरी करण्याची तळमळ त्यांची नेहमी असे. त्यांच्या जाण्याने परिसरातील अनेक लोक हळहळ व्यक्त करत होते.

त्या आर यू.मोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या सासू होत्या, तर जिल्हा न्यायालय बीड येथील आप्पा मोरे व राहुल आर. मोरे यांच्या त्या आजी होत्या.

आज त्यांच्या संस्कारातूनच त्यांची पुढील पिढी शासकीय, डॉक्टर,इंजिनिअर,शैक्षणिक,वकील या सर्वच क्षेत्रात आपले कार्य करत असून त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली, सुना,जावई, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकीय, सामाजिक,शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मंडळी तसेच परिसरातील मंडळी नातेवाईक ,आपेष्ट मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Back to top button