श्रमजीवी संघटनेचा शिवसेना – भाजप महायुतीला जाहिर पाठींबा

राज्यातील कष्टकरी आदिवासींचे शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटावे या अपेक्षेतून महायुतीला पाठींबा – रामभाऊ वारणा

उसगाव(प्रतिनिधी)दि.२: ठाणे,पालघर जिल्ह्यासह नाशिक, रायगड आणि मुंबईतील अनेक मतदारसंघात निर्णायक मतदार असलेल्या श्रमजीवी संघटनेने अखेर आज सेना- भाजप महायुतीला पाठींबा जाहीर केला. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी ही घोषणा केली. राज्यातील आदिवासी, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सरकारने सोडवावेत या अपेक्षेतून हा पाठींबा दिला असल्याचे वारणा यांनी संगितले.

श्रमजीवी संघटना ही गोरगरीब कष्टकरी कामगार, शेतकरी,शेतमजुरांची संघटना ठाणे, पालघर, रायगड ,नाशिक आणि मुंबई सह राज्यातील आदिवासी भागामध्ये सक्षमपणे कार्यरत आहे. संघटना ही राजकीय नसून सामाजिक विचारांची आहे मात्र स्वातंत्र्यासाठी हजारों क्रांतीवीरांनी दिलेले बलीदान ज्या अपेक्षेने होते त्या अपेक्षेची लोकहिताची व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे क्रमप्राप्त आहे. परिणामी निवडणूक प्रक्रियेत भूमिका घेणे ही संघटनेची जबाबदरी आहे असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. संघटनेच्या सभासदांनी आतापर्यंत नेहमीच संघटनेच्या आदेशाचा सन्मान करत आपली एकजूट मतपेटीत दाखवून दिली आहे.

संघटना ज्या योग्य उमेदवाराला पाठींबा देतो तो उगेदवार जिंकून येतो हे संघटनेने अनेकदा दाखवून देले आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यक्षेत्रात दुर्गम भागात कुपोषण,रोजगार हमी, शालेय व महाविद्यलयीन विद्याथ्यांचे प्रश्न, युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणाचे प्रश्न, अंगणवाडी , वन जमिनीचा प्रश्न, ठाणे व पालघर जिल्हयातील रेशनिंग प्रश्नावर , आदिवासींच्या रोजगारासाठी स्थलांतराचा प्रश्न, रिंचन योजना, वसई विरार महानगरपालिकेत अन्यायकारकरित्या समाविष्ट केलेली गावे वगळण्याबाबतचा प्रश्न, या विविध मुद्यांवर श्रमजीवी संघटनेने अनेक आंदोलनं केली आहेत, स्वतः विवेक पंडित आणि कार्यकर्ते अनेकदा या प्रश्नासाठी तुरुंगातही गेले आहेत. मात्र नेहमीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या लढ्याबाबत दखल घेत सकारात्मक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

काही प्रश्न आजही प्रलंबित असल्याने विवेक पंडित यांनी थोडी परखड भूमिका घेतली होती. तदनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी विवेक पंडित यांची या विषयांवर चर्चा झाली.दोघांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर श्रमजीवी संघटनेने भाजपा -शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा जहीर केला.संघटनेच्या भूमिकेचे नेहमीच स्वागत करत चर्चा घडवून कष्टकरी आदिवासी शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न समजून घेऊन त्यासाठी सकारात्म आदेश नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. म्हणूनच भविष्यात पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, रायगड, नाशिक येथील प्रश्नांसोबतच राज्यातील शेतकरी व आदिवासींचे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस सोडवतील असा विश्वास वाटत असल्याने आम्ही शिवसेना भाजप महायुतीला पाठिबा दिला असल्याचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी यावेळी सांगितले.

संघटनेचा आदेश आणि नियोजनाप्रमाणे संघटनेचे कार्यकार्ये सभासद आणि पदाधिकारी या निवडणुकीत सेना- भाजप लोकसभा उमेदवारांचे काम करून आपल्या एकजुटीची ताकद दाखवतील असा विश्वासही यावेळी वारणा यांनी व्यक्त केला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.