बीड:प्रतिनिधी― बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. उत्कर्ष गुट्टे हे बीड शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत नसून ते फक्त कोणाचेतरी रबर स्टॅम्प म्हणून काम करताना दिसत आहेत. बीड शहरा मधील प्रश्न मांडण्याचे काम आम आदमी पार्टी पाठीमागील दोन वर्षापासून निवेदने देत आहे आंदोलन करत आहे परंतु मुख्य अधिकारी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत बीड शहर सर्व घाणीने ग्रस्त असताना नगरपरिषदेला ओ डी एफ हा मानांकन पुरस्कार मिळतो हे एक हास्यास्पद आहे. वाहत असलेली बिंदुसरा नदी या नदीमध्ये होत असलेले अतिक्रमण या नदीमध्ये होत असलेलं घाणीचे साम्राज्य भू माफियांचा कब्जा शहरांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर होत असलेली कामे रस्त्याची नालीचे कामे एकही इस्टिमेन्ट प्रमाणे होताना दिसत नाहीत. सर्व शहरांमध्ये धुळीचे साम्राज्य रस्त्यांना पडलेले खड्डे रस्त्यावरती होत असलेले अतिक्रमण बंद पडलेल्या नाल्या फक्त आणि फक्त गुत्तेदार यांना पोहोचण्याचं काम हे मुख्य अधिकारी करत आहेत संपूर्ण शहर घाणीच्या विळख्यात असून ज्या कंपनीला स्वच्छतेचा टेंडर दिला गेलं त्या कंपनी वरती कारवाई झालेली दिसत नाही. म्हणून आम आदमी पार्टीने या बीड शहरामध्ये घंटा नात आंदोलन. टेंबा आंदोलन, रस्त्यावरील खड्डे मोजणे आंदोलनं, उपोषण, धरणे, परंतु या मुख्य अधिकारी उत्कर्ष गुटे नगर परिषद बीड यांना याचा काहीही फरक पडलेला नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी जी यांच्या पुण्यतिथी दिवशी नगर परिषदेच्या माध्यमाने छत्रपती संभाजी महाराज क्रिरणांगना मध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या भोवती घाणीचे साम्राज्य होते तेथे साफसफाई व्हायला पाहिजे होती सरकारी महेकमा येऊन फुल हार करायला पाहिजे होतं परंतु ते करताना या मुख्य अधिकारी. उत्कर्ष गुटे नगर परिषद बीड व यांच्या कर्मचाऱ्यांना महात्मा गांधीजींचा विसर पडलेला आहे अशां अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बीड शहरांमधून लवकरात लवकर बदली करण्यात यावी या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टी च्या वतीने निदर्शने करण्यात आले आहे या वेळी आशोक येडे, जिल्हाध्यक्ष अक्रम शेख, उपाध्यक्ष रामधन जमाले, सचिव प्रा.ज्ञानेश्वर राऊत.सघटन मंत्री सय्यद सादेक, शहरं अध्यक्ष सतीश बडे,माजी सैनिक प्रकाश वाघमारे, कार्यकर्ते व सामान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते