आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
जरंडी दि.०२:जरंडी ता,सोयगाव गावाजवळ मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेले माध्यमिक शिक्षक संजय पवार यांचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान जळगावला मृत्यू झाला.घटनेचे वृत्त जरंडी गावात येवून धडकताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या राहत्या गावी करंजखेड ता.कन्नड येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जरंडी ता.सोयगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक संजय पवार हे रविवारी सोयगाव कडून जरंडीला मोटारसायकल क्र-एम,एच-२० डी,क्यू-१३०३ येत असतांना गावानजीक त्यांचा तोल जावून घसरल्याने त्यांच्या मेंदूला जबर मार लागला होता.दरम्यान तातडीने उपचारासाठी त्यांना जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता,त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.