लिंबागणेश: आज दि.१२ फेब्रुवारी २०२२ वार शनिवार रोजी सकाळी ८ वाजता तुळजापुर येथे दर्शन घेऊन जामखेड कडे जाणारी स्विफ्ट डिझायर लाल रंगाची गाडी (गाडी क्रमांक एम. एच.१३ टीसी २४६ )गाडीवर नियंत्रण सुटल्याने खोल खड्ड्यात पालटली.अपघातात जामखेड येथील अभिषेक अधारे वय २२ वर्षे ,गौरव जाधव वय २४ वर्षे, अक्षय पवार वय २३ वर्षे, अक्षय जाधव वय २३ वर्षे असून त्यातील एकजण गंभीर जखमी झालेला असून गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
उपघातस्थळी महाजनवाडी येथील शिवाजी घरत लिंबागणेश येथिल विक्की वाणी व त्यांच्या सहका-यांनी जखमीला गाडीच्या बाहेर काढण्यास मदत केली .
घटनास्थळी मांजरसुंभा येथील राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्रातील कर्मचारी ठोंबरे, मेह्त्रे, राठोड पोलीस नाईक व थोरात, उबे काॅन्स्टेबल पोहचले त्यांनी सविस्तर माहीती घेतली. जखमींना रूग्णवाहीके द्वारे बीड जिल्हारूग्णालयात पाठवण्यात आले.