बीड जिल्हा

वीस वर्षापासून रहात असलेल्या जागेवर चुकीच्या ठरावाने केले दुसऱ्याच्या नावावर

सौताडा ग्रामपंचायत चा प्रताप वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल:- गट विकास अधिकारी राख साहेब

पाटोदा दि.13: सौताडा येथील सतीश सुदाम उबाळे यांच्या मालकी असलेल्या मालमत्ता क्रमांक 11 84 जागेवर मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून नळपट्टी व घरपट्टी भरत असतांना ती जागा सरपंच आणि ग्रामसेवक बी आर नागरगोजे यांनी संगनमताने दुसऱ्यांच्या नावावर करण्यात आली आहे. याविरोधात उबाळे यांनी माहिती अधिकारात माहिती मागतली असता पीटीआरवर शपथपत्र YE424202 च्या आधारे नोंद केल्याचे दिसून आले तर दि.२२/१२/२०२१च्या सरपंच छाया नवनाथ सानप यांच्या अध्यक्षतेखाली मासिक मीटिंग मध्ये सदर झालेली नोंद रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला सौताडा ग्रामपंचायतच्या १४ सदस्य असतांना फक्त सहा सदस्यांच्या उपस्थितीत बोगस ठराव घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच सूचक म्हणून नमूद केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची यावर स्वाक्षरी नसताना तसेच या बैठकीसाठी बहुमत नसतांना हा ठराव मंजूर कसा करण्यात आला.या सावळ्या गोंधळा विरोधात सतिश उबाळे हे पंचायत समिती समोर दि.१० फेब्रुवारी गुरूवार पासुन उपोषणाला बसले असुन जोपर्यंत न्याय मिळत नाही व घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही अशी तत्पर भावना व्यक्त केली आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष गोरख झेंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत सतिश उबाळे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी त्यांच्या बरोबर संघर्ष करणार असा इशारा दिला होता.पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राख यांनी सविस्तर वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी बीड, मा तहसीलदार साहेब पाटोदा,मा पोलीस निरीक्षक साहेब पाटोदा यांना इमेल व टपाला व्दारे महिती दिली असून या चुकीच्या केलेल्या जागेच्या नोंदीवर ग्रामसेवक बी आर नागरगोजे व ग्रामपंचायत जबाबदार आहे असा ठपका ठेवला ठेवला असून वरिष्ठाचे आदेश येताच पुढील कारवाई करण्यात येईल असे पत्र सतीश उबाळे यांना दिले आहे. सौताडा ग्रामपंचायत मध्ये अनेक सावळागोंधळ चालू असून सरपंच पती हाच सरपंचाचा कारभार चालवतात त्याचप्रमाणे एकला चलो रे चा नारा देत कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला काडीचीही किंमत न देता शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न सुरू असून यापूर्वीच बोगस ठरावाच्या आधारे सरपंच यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर घेतली होती. त्याचप्रमाणे गेल्या चार वर्षात अनेक ठरावावर ग्रामपंचायत सदस्याच्या बोगस सह्या असल्याचे दिसून येत आहे असे एक ना अनेक घोटाळे बाहेर येत असून सरपंच छाया नवनाथ सानप व ग्राम सेवक बी आर नागरगोजे यांच्या पदावर गंडांतर येण्याची शक्यता दिसून येत आहे.

Back to top button