आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.०२: शहरातील प्रभाग क्र-१७ मध्ये महिनाभरापासून पाईपलाईनच्या अडचणीमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार मंगळवारी चक्क प्रभागातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे करूनही यावर कोणतेही आश्वासन न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले आहे.महिनाभरापासून या प्रभागातील नागरिकांना पाणीच मिळत नसल्याचा आरोप आहे.
नगर पंचायतीचा शेवटचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १७ मध्ये महिनाभरापासून कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.ऐन दुष्काळात या प्रभागातच पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रभागातील रहिवास्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.या प्रभागातील नळांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांना इतर प्रभागात हाताकांती करावी लागत आहे.नगर पंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या वाढतच आहे,या प्रभागाच्या पाईपलाईनला ठिकठिकाणी लिक झाल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत असतांना नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे.याबाबत नागरिकांनी लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नगर पंचायत प्रशासनाला पाण्यासाठी निवेदन दिले आहे.निवेदनावर शालिक गवळे,माधव गवळे,प्रकाश परेरव,कैलास परेराव,शेख रशीद,अमृत साबळे,धोंडू पाटील,आदींसह नागरिकांच्य स्वाक्षऱ्या आहे.