बीड जिल्हा

कान्होबा दरा येथिल बालब्रम्ह्यचारी ह.भ.प.राजाराम महाराज अनंतात विलीन

कडा:शेख सिराज― आष्टी तालुक्यातील केळ-पिंपळगाव घाट येथिल (कान्होबा दरा) कानिफनाथ देवस्थान येथिल बालब्रम्ह्यचारी ह.भ.प.राजाराम महाराज यांना माघ शुध्द एकादशीला शनीवार दिं.१२ फेब्रुवारी २०२२ रोजी राञी ११;११वाजता देवज्ञा झाली.रवीवारी सकाळी गावभर अंतिम दर्शनासाठी रथ मिरवणूक करून दु. ३वाजता शोकाकुळ वातावरणात महाराजांचे उत्तराधिकारी ह.भ.प. अशोक पवार महाराज यांच्या हस्ते मुखग्नी देण्यात आला.
राजाराम महाराज यांनी संपूर्ण आयुष्य बालब्रम्ह्यचारी राहून गेली पस्तीस वर्षे कानिफनाथ देवस्थान येथे सेवा केली.केळ-पिंपळगाव येथिल जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिले.
यावेळी ह.भ.प.छगन महाराज,कराळे महाराज,रामानंद स्वामी महाराज,रमेश महाराज,मा.सभापती.अशोक ईथापे,सालेवडगावचे सरपंच महादेव डोके,कोडगावचे मा.जि.प.सद्स्य बाबासाहेब खरसे,दौलावडगाव चे उपसरपंच नंदकुमार फसले,युवा नेते भरत जाधव,बांदखेलचे सरपंच भास्कर थोरात आदी मान्यवरानी महाराजांचे अंतिम दर्शन घेऊन श्राध्दाजंली वाहिली.पंचकृषीतील दौलावडगाव,देऊळ गावघाट, हरेवाडी,मराठवाडी,राहणी,माथणी,जाम-कोडगाव,सालेवडगाव,भातोडी-पारगाव,बांदखेल येथिल शेकडो भाविकांनी महाराजांचे अंतिम दर्शन घेऊन जड अंतकर्णांनी आखेरचा निरोप दिला.

Back to top button