बीड(प्रतिनिधी):
बीड जिल्ह्य़ात कोरोना कालावधीत मुलींचा जन्मदर घटण्यास जिल्हाप्रशासनाचे सोनोग्राफी सेंटरकडे दुर्लक्ष असल्याचा निष्कर्ष पत्रकार परीषदेत काढला त्यावर भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंढे यांनी तिव्र चिंता व्यक्त करणे हास्यास्पद असुन त्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री बीड असताना उच्च व सर्वोच्च न्यायालयाने गुन्हे कायम केलेल्या अवैध गर्भपातातील गुन्हेगार डाॅ.अशोक थोरात यांची जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड पदी नियुक्ती केली होती, पीसीपीएनडीटी कायदा राबवणारे प्रमुख म्हणून जिल्हाशल्यचिकित्सक हे वरिष्ठ आधिकारी असतात आणि त्याच गुन्ह्यातील आरोपी कसा काटेकोर कायदा राबवणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळेच पंकजाताई मुंढे यांना या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.
डाॅ.अशोक थोरात यांची जिल्हाशल्यचिकित्सकपदी नियुक्ती करणारांवर प्रशासकीय कारवाई करा –डाॅ.गणेश ढवळे
____
अवैध गर्भपातातील उच्च व सर्वोच्च न्यायालयाने गुन्हे कायम केलेले डाॅ.अशोक थोरात यांची पीसीपीएनडीटी कायदा राबवणारे प्रमुख या नात्याने जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड पदावर नियमबाह्य नियुक्ती करणारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांच्या मार्फत अध्यक्ष राज्य महिला आयोग रूपालीताई चाकणकर, जिल्हाधिकारी बीड, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय मुंबई यांना केली आहे.