डॉक्टर खासदार असल्याचा आम्हाला अभिमान, कॅबिनमध्ये बसून पासपोर्ट मिळाला- डॉ.बारकुल
बीड (प्रतिनिधी): बीड जिल्हयाच्या खासदार डॉक्टर असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असून परदेशात जाण्यासाठी आता कॅबिनमध्ये बसून बीडमध्येच पासपोर्ट मिळतो. देशाच्या संसदेत मराठीतून भाषण करणारा आमच्या खासदारांना पुन्हा दुसर्यांदा संधी निश्चीत मिळेल असा विश्वास प्रसिध्द ह्दयरोग तज्ञ डॉ.बारकुल यांनी बोलून दाखवला. बीड जिल्हयाचे राजकारण सुसंस्कृत, हेल्दी असावं असे मला नेहमी वाटते त्याचबरोबर विरोधकांनी राजकारण करताना आपल्या जिभेची काळजी घेतली तर सामाजिक हेल्थ चांगले राहिल असा टोमणा मारुन उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडेंनी उपस्थित डॉक्टरांची मने जिंकली. जबाबदारीची जाणिव ठेवून काम करते, माझ्यावर विश्वास ठेवा मी निश्चीत सर्व प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणारा नाही असा विश्वास त्यांनी दिला.
हॉटेल यशराज इन येथे आयोजित केलेल्या डॉक्टरांच्या विविध संघटनेच्या बैठकीत संवाद साधताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री चंद्रकांत नवले हे होते. डॉ.अभय वनवे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर डॉ.बारकुल यांनी आपल्या भावना आणि काही डॉक्टरांचे प्रश्न याचा वहापोह करताना शहरात पासपोर्ट कार्यालय प्रितमताई मुळे झाले ही फार मोठी उपलब्धी आमच्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बोलताना बालरोग तज्ञ डॉ.सुभाष जोशी म्हणाले की, देश कोणाच्या हाती द्यावा ज्यांनी आपल्या देशाची मान जगाच्या पाठिवर उंचावली, देशाची सुरक्षितता, आर्थिक समृध्दता आणि मुलभुत गरजा हे सर्व सुशिक्षीत वर्गाने विचारात घेवून डॉ.प्रितमताईंना आशिर्वाद द्यावेत असे त्यांनी सांगितले. दरम्यान या बैठकीत अनेक डॉक्टरांनी बोलून दाखवलेल्या भावना ऐकल्यानंतर डॉ.प्रितमताईंचा उत्साह वाढला आणि निवडणुकीत प्रचार करण्यासाठी मला माझ्या कौटुंबिक लोकाचे बळ मिळाल्यासारखा आनंद वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
काम पाहून चांगले माणसे आशिर्वाद देतात आणि मग मलाही समाधान वाटते हे सांगताना सकारात्मक दृष्टीकोणातून वैद्यकीय क्षेत्रातील लोक माझ्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहताना मला दिसतात. बीड जिल्हयाचे राजकारण स्वच्छ व सुसंस्कृत असावे यासाठी ना.पंकजाताई यांनी गेल्या पाच वर्षात केलेला प्रयत्न आणि आलेले यश चांगले असून राजकारणात हेल्दी वातावरण असेल तर सामाजिक ऐक्य चांगले राहते मात्र आमचे विरोधक नको ते आरोप करत जेव्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सामाजिक हेल्थ साठी जिभेची काळजी त्यांनी घ्यावी असा टोमणा या बैठकीत कोणाचेही नाव न घेता मारला. डॉक्टरांच्या प्रश्नावर मी संधी मिळाल्यानंतर विशेष लक्ष घालून केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही हे सांगताना जास्त अपेक्षा आणि त्याचे ओझे या जबाबदारीची जाणिव ठेवूनच आम्ही भगिंनी जिल्हयात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी व्यासपीठावर रमेश पोकळे, कुंडलिक खांडे, डॉ.परमेश्वर बडे, डॉ.ढगे, डॉ.अनिल ढगे, डॉ.ओस्तावाल, डॉ.भगवान जाधव, डॉ.घोळवे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. डॉ.अभय वनवे, डॉ.लक्ष्मण जाधव यांनी बैठकीचे नियोजन शिस्तबध्द शिस्तबध्द केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.सौ.बडे व डॉ.जाधव यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनेचे पदाधिकारी व प्रतिष्ठीत डॉक्टर यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. विशेष म्हणजे या बैठकीला शहरातील शंभर टक्के यांची उपस्थिती होती. या बैठकीत गेवराई येथून आलेले डॉ.भगवान जाधव यांनी ‘‘घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, स्व.गोपीनाथराव मुंडेंच्या विचाराशिवाय पर्याय नाही बीड जिल्हयाला’’ अशी शेरोशायरी करून भाषणाने बैठकीत रंगत आणली.