सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―गोंदेगाव ता.सोयगाव येथील सरस्वती भुवन संस्थेच्या परीक्षा केंद्रात भरारी पथकाकडून दहावीच्या परीक्षेत बीज गणिताच्या पेपरला सामुहिक कॉपी प्रकरणाचा प्रकार उघडकीस आल्यावरून आय केंद्रावरील तब्बल ३२१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव करण्यात आला असून शैक्षणिक वर्ष सुरु होवूनही अद्यापही संबंधित विभागाकडून चौकशीचा ससेमिरा आटोपत नसल्याने पाल्यांच्या भवितव्यासाठी मंगळवारी चक्क पालकांनी संस्थेत पालक मेळावा घेतला तर काही पालकांनी पाल्यांच्या निकालासाठी थेट सोयगाव गाठल्याने सामुहिक कॉपी प्रकरणाच्या हालचाली सोयगाव,गोंदेगावला मंगळवारी गतिमान झाल्या होत्या.
सामुहिक कॉपी प्रकरणात दोषींना कारवाई करून अहवाल मोकळे व्हा परंतु आमच्या पाल्यांना या प्रशासनाच्या कचाट्यातून मुक्त करून त्यांची तातडीने फेरपरीक्षा घेवून मुक्त करा यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ नका अशी आर्त हाक मंगळवारी पालकांनी केली आहे.दरम्यान याप्रकरणी तातडीने(दि.२५)जिल्हापरिषद सदस्या पुष्पा काळे यांनी औरंगाबाद विव्हागीय बोर्ड येथे संबंधितांच्या भेटी घेवून तातडीने दोषींवर कारवाई करण्यासाठी विद्यार्थ्यांकॅह नाहक बळी कशासाठी देता असा प्रश्न करून विद्यार्थ्यांना तातडीने यातून मुक्त करण्याची मागणी केली असता,संबंधिताकडून येत्या २८ तारखेला याबाबत निर्णय घेण्यात येईल असे उत्तर देण्यात आले होते.दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे यांनीही याबाबत विचारणा करून विद्यार्थ्यांची मुक्तता करावी अशी भूमिका दर्शविली होती.दरम्यान गोंदेगावच्या पाल्यांच्या पालकांनी मंगळवारी सोयगावला रंगनाथ काळे यांची भेट घेतली यावेळी रंगनाथ काळे यांनी त्यांना निकालाबाबत मी स्वतः बुधवारी बोर्डात जावून भेट घेवून निर्णय घेतो असे आश्वासन दिले.
0