ब्रेकिंग न्युज

छत्रपती शिवाजी महाराजांचे चे विचार सध्या आचरणात आणण्याची गरज-डॉ.संतोष मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी लोककल्याणकारी राज्यकारभार करत सर्वधर्मसमभाव जोपासला शिवरांचे विचार आपल्या आचरणातुन सत्यात आणले समाजातील अनेक प्रश्न सहज सुटतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्रचे अध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले.
संगम ता.परळी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उदघाटक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा ना.धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, अध्यक्ष परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी(पिन्टु)मुंडे प्रमुख पाहुणे पो.उप.नि.(ग्रामीण)डॉ.विशाल शहाणे,नाथ प्रतिष्ठान उपाध्यक्ष प्रा.शंकर कापसे,जेष्ठ नेते राधाकृष्ण साबळे पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय ता.अध्यक्ष दत्ताभाऊ सावंत, लोणी सरपंच विश्वनाथ देवकते, शिव व्याख्यात्या कु.श्रुतीताई जाधव प्रमुख उपस्थिती सरपंच गंगाधर नागरगोजे, तंटामुक्ती अध्यक्ष बापुदादा नागरगोजे,मंडळ कर्षी अधिकारी गादेकर मँडम, नेत्र तज्ञ डॉ. मोहन मुळे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुमीत काळे, जि.प.शाळा मुख्याध्यापक नावंदे सर,मा.उपसरपंच हनुमंत कामाळे, युवक नेते हरीश नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य युनुस बेग, अनिल कामाळे, टोकवाडी ग्रामपंचायत सदस्य सुनील मुंडे, रावसाहेब नागरगोजे, बबनराव गिराम,माणीक गिराम, जेष्ठ नेते व्यंकटराव हरणावळ,दत्ता गिराम, संदिपान कोकाटेमा.उपसरपंच हरिभाऊ गिराम, पो.पा.पांडुरंग रोडे,प्रभाकर गिराम,बाळु गिराम,शिवाजी राजे कोकाटे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.वेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉ.संतोष मुंडे म्हणाले की,छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.आजची सुशिक्षीत पिढी शिवचरित्र वाचुन प्रगल्भ होत आहे.संगम येथे आयोजित शिवजयंती ही खर्या अर्थाने शिवरायांना अभिप्रेत असलेली जयंती साजरी होत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अंकुश गिराम, उपाध्यक्ष गोविंद गिराम, सचिव अभिषेक गिराम, सहसचिव गणेश चव्हाण, बबन काळे, गोविंद चव्हाण, अच्युत चव्हाण, मनोज गिराम,संतोष कोकाटे, सचिन गिराम, माऊली सुरनर, प्रमोद कोकाटे,प्रताप मोगरे, भारत गायकवाड, सोमेश्वर दराडे, मोना नागरगोजे, किशोर गिराम,बाबा रोडे, बंडु गिराम, रुक्षी जाधव, लहुदास चव्हाण, ईश्वर चव्हाण,प्रताप कोकाटे, नंदु गिराम, महेश कामाळे, श्रीकांत नागरगोजे, निलेश काळे, सुरेश वाघमारे,श्रीकांत गिराम, वैभव गिराम आदींनी परिश्रम घेतले.
सार्वजनिक शिवजन्मोत्सवसमिती ,ना.धनंजय मुंडे आरोग्य मीत्र योजना व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व कानाची काँम्नयुटराईजड मशीन तपासणी (अँडोमेट्री)शिबिर घेण्यात आले. या शिबीराचे उदघाटन डॉ. संतोष मुंडे, सभापती बालाजी(पिन्टु)मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button