औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजशेतीविषयकसोयगाव तालुका

सोयगाव मधील कवली येथील शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात सोयगावला उष्माघाताचा पहिला बळी

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
जरंडी दि.०३:कवली ता.सोयगाव शिवारात कपाशी उपटण्याच्या कामासाठी गेलेल्या शेतमजुराचा शेतातच चकरा व तोंडाला फेस येउवून तडफडून उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.या प्रकरणी सोयगाव महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी तालुका प्रशासनाच्या पथकाने भेटी दिल्या आहे.दरम्यान जिल्ह्यात उष्माघाताचा हा पहिला बळी असल्याची चर्चा तालुकाभर सुरु आहे.
जैनोद्दिन मन्सूर तडवी(वय ५५)असे उष्माघाताने मृत झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.कवली ता.सोयगाव शिवारात कपाशी उपटण्याच्या कामासाठी शेतात रोजंदारीवर गेला असता त्याचा काम करतांनाच मृत्यू झाला आहे.परिसरातील शेत मजुरांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तातडीने त्यास पिंपळगाव(हरे) ता.पाचोरा येथे तातडीने उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.दरम्यान सोयगाव तालुक्यात आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता अधिकच प्रकर्षाने जाणवत असल्याने तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.जळगाव जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या सोयगाव तालुक्यात उन्हाची दाहकता वाढली असल्याने खानदेशचं तापमानाने तालुकावासी होरपळले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.