बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

इंदुरीकर महाराज यांचे भर किर्तनात मोबाईल बंद करण्याचे आदेश ?

बीड:नानासाहेब डिडुळ― माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप यूट्यूबवर अपलोड करुन अनेकांनी कोट्यवधी पैसे कमवले, मात्र त्यांची अपत्ये दिव्यांग जन्माला येतील, असं वक्तव्य करत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले होते. अकोल्यातील या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर इंदुरीकरांवर सर्व स्तरातून टिकेची झोड उठली आहे. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील कासारी बोडखा गावात इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन होतं. या कीर्तन सोहळ्यात मात्र इंदुरीकरांनी मोबाईलवर शूटिंग करणाऱ्या व्यक्तींना मोबाईल बंद करण्यास भाग पाडले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. मोबाईल बंद करण्यासाठी इंदोरीकर महाराज दम देऊन बोलताना दिसत असल्याची माहिती मिळत आहे.

Back to top button