पुणे : येथील गंगाधाम चौक येथे रात्री १०.३० च्या सुमारास एका वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.पोलीस आणि प्रत्यक्षदर्शी काही व्यक्तींच्या म्हणण्यानुसार भरधाव वेगाने येणाऱ्या एका फॉर्च्यूनर च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सदर गाडी ही रस्ता सोडून फूटपाथवर गेली. यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या फुटपाथवर असलेल्या दोन स्टॉलचे देखील नुकसान झाले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते.