अकोट तालुकाअकोला जिल्हाक्राईमब्रेकिंग न्युज

जऊळखेड - धारेल शिवारात पाच हरणांची शिकार ; आरोपी मांस व गाडी सोडून फरार

दहिहांडा पोलिसांची कारवाई

अकोट: खारपाणपट्टयातील जऊळखेड-धारेल शेतशिवरात पाच हरणांची शिकार करण्यात आली. हे मास आरोपी गाडीवर घेऊन जात असतांना दहिहांडा पोलिसांनी रंगेहात पकडले. मात्र, आरोपी मांस व गाडी सोडून पसार झाले. ही कारवाई सोमवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या घटनेमुळे चोहट्टा परिसरात खळखळ उडाली. अकोट वनक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या दहिहांडा पोलिस स्टेशन हद्दीतील जऊळखेड धारेल हे शिवार येते. दहिहांडा पोलिस स्टेशनचे दोन कर्मचारी पो.काॅ.राजेश पायधने व गाडीचा चालक सोळंके हे चोहट्टा ते रेल- धारेल जऊळखेड मार्गावरसोमवारी रात्री ३ वाजता गस्त घालत होते. यादरम्यान त्यांनी एम.एच ३० बी.ए.००६३ क्रमांकाच्या काळया रंगाच्या हिरोहोंडा गाडीवर दोन इसम पोत्यामध्ये काहीतरी वाहून नेत असल्याचे दिसून आले. त्यांनी आपली गाडी थांबवली असता दोन आरोपी गाडी व मांसाने भरलेले ७० किलो वजनाचे पोते व एक लांब लोखंडी पाइपची नळी होती. यामध्ये बारूद व छर्रे भरून फटाक्याच्या टिकली लावून फायर केले जाते हे औजार सोडून अंधारात फायदा घेत धारेल ते जऊळखेड रोडवरून पोबारा केला. त्यावेळी या दोन पोलिस कर्मचारयांनी गाडी व मांस शस्र गाडीमध्ये टाकून चोहट्टा पोलिस चौकीत आणले. यावेळी कुटासा येथील डाॅ अरूण पाठक यांना बोलावून मासांचे नमुने तपासले असता ते नमुने हरिणांचे असून पाच हरिणाची शिकार झाल्याचे सिद्ध झाले. सध्या वीटभट्टीवरील बाहेरील राज्यातील मजुरांना वीटभट्टीवर २०० रू.किलोप्रमाणे मांस विकल्या जात असल्याच्या चर्चेला परिसरात उधान आले आहे. नेमके हे मांस एका मोठ्या पार्टीला किंवा लाटांच्या कारखान्यावर विक्रीला जात असल्याची सुध्दा चर्चा आहे. या घटनेची माहिती दहिहांडा पोलिसांनी वनविभाग तालुका अधिकारी बावने यांना देऊन पाच हरिणाचे ७० किलोचे मांस त्यांच्या स्वाधीन केले. या घटनेचा तपास दहिहांडा ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅ.विजय सावदेकर, मंगेश खेळकर हे.काॅ.वक्टे करत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.