2020 च्या पिक विमा वंचितांचा बोंममारो आंदोलनांतुन एल्गार
बीड दि.२१(नानासाहेब डिडुळ): पुर्ण बीड जिल्ह्यात पाटोदा व शिरूर 2020 च्या पिक विम्या पासून वंचित का राहिले हा नेमका कोणाचा दोष आहे. ऐन परिक्षाच्या काळात वीज वितरण कंपनीने जो गोंधळ घातला आहे. त्यामुळे येणारी पिढीचे भविष्य अंधकारमय होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.ज्या शेतकऱ्यांचे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने जे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई राज्य सरकारने करावी.असे प्रतिपादन कॉ.महादेव नागरगोजे यांनी केले.
आज दि.२१ मार्च रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष,किसान सभा व शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने पाटोदा तहसील कार्यालयावर मोर्चा काढत बोंबमारो धरणे आंदोलन करण्यात आले होते.
हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चात शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांनी विमा कंपनी, वीज वितरण कंपनी, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत बोंबमारो आंदोलन केले.या आंदोलनाला शेतकरी संघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रा.सुशिलाताई मोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की.केंद्र सरकार व तिन पक्षाच्या सरकार मध्ये पीक विमा संदर्भात टोलवाटोलवी चालू आहे. तुमचा वाद तिकडेच चालू ठेवा मात्र आमच्या शेतकऱ्यांचे जे हक्काचे आहे ते त्यांना मिळाले पाहिजे. जर याकडे दुर्लक्ष करण्यात येत असेल तर या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना व पालकमंत्री यांना सुध्दा आम्ही फिरू देणार नाही. असा इशारा प्रा.सुशिलाताई मोराळे यांनी दिला.यावेळी आपल्या मागणीचे निवेदन मा.तहसीलदार रूपाली चौगुले यांना देण्यात आले.