बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

हाळमच्या अमृतमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीने ग्रामस्थ भारावले

पंकजाताईंनी श्रोत्यात बसून घेतला किर्तन श्रवणाचा लाभ अन् पंगतीत भाविकांनाही वाढले

धार्मिक कार्यक्रमातून चांगले विचार आत्मसात करा, चांगलचं होईल

परळी दि.२१:स्व. विठ्ठल महाराज धर्मापुरीकर यांच्या अमृतमहोत्सवी स्मृती अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मोठया उत्साहात झाली, त्यांच्या उपस्थितीने ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित झाला. उपस्थित सर्व ग्रामस्थ यावेळी भारावून गेल्याचे पहावयास मिळाले.

गेल्या १५ मार्चपासून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. गावच्या सप्ताह परंपरेला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाले आहे. सप्ताहात रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांच्या रामकथा श्रवणाचा भाविकांनी लाभ घेतला. आज सांगता सोहळ्या निमित्त ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वै. विठ्ठल महाराज धर्मापुरीकर यांची प्रतिमा भेट देऊन झोलकर महाराजांनी पंकजाताईंचे स्वागत केले. सप्ताहास पंकजाताईंनी शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सहभागी होता आले याचा आनंद झाला. हाळमचं आणि आमचं नातं पूर्वीपासूनच घट्ट आहे. हा परिसर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा आहे. गढूळ झालेले पाणी तुरटी फिरवून जसे स्वच्छ करतात तसे समाजातील गढुळ विचार स्वच्छ करण्याचे काम अशा धार्मिक कार्यक्रमातून होत असते, हे आजच्या परिस्थितीत आवश्यकच आहे. चांगलं वागल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही, वाईटाच वाईटच होतं, त्यामुळे चांगली वृत्ती ठेवा, चांगल काम करा, चांगलच होईल असं सांगत पंकजाताईंनी ग्रामस्थांना आपल्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले.

● पंगतीत भाविकांना वाढले अन् सर्वांसोबत जमिनीवर बसून घेतला महाप्रसाद
——————–
पंकजाताई मुंडे यांनी या सप्ताहात श्रोत्यात बसून संपूर्ण किर्तन श्रवणाचा लाभ घेतला. त्यानंतर भाविकांच्या भोजन कक्षात जाऊन स्वतः पंगतीत बसलेल्या भाविकांना वाढले. एवढेच नव्हे तर सर्वांसोबत जमिनीवर बसून महाप्रसादाचा लाभही घेतला. राजकारणात काम करत असतांना त्यांचा हा साधेपणा पाहून उपस्थित भाविक व ग्रामस्थ भारावून गेले.

कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव गुट्टे, वैद्यनाथ बँकेचे उपाध्यक्ष रमेश कराड, विनायक गुट्टे, निळकंठ चाटे, राजेश गिते, मोहन होळंबे, सुंदर मुंडे, माधव मुंडे, देवनाथ दहिफळे, मंचकराव गुट्टे, गोविंद दहिफळे, अंगद दहिफळे यांसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

Back to top button