बीड(प्रतिनिधी): काल-परवाच भाजप च्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी महाराष्ट्र राज्य शासनाकडे मागणी केली की हिंदू धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीतेचा शालेय शिक्षणात समावेश करा? अशी जाहीर मागणी करून भाजपचे राजकारणी हिंदू राष्ट्राच्या दिशेने चालत असल्याचे सिद्ध झालेले आहे. या अगोदर 7 डिसेंबर 2014 ला तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भगवद्गीतेला 5151 वर्षे झाल्याबद्दल आर.एस.एस.च्या वतीने दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात भगवद्गीतेला देशाचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करा अशी संविधान विरोधी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी कडे केली होती.
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या देशात जवळ पास 600 संस्थान होती.स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारत आणि संस्थान भारत अशा दोन भागात आपला भारत देश विभा
गला होता.याचा अर्थ एक संघ भारत नव्हता पण जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू झाले तेंव्हा पासून 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश10 प्रमुख धर्म 7500 हजार जाती अनेक पंथ,भाषा,परंपरा यांना एका माळेत बांधण्याचे काम कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथाने नाही तर भारतीय संविधानाने केलेले आहे.आणि हो आज भारतात भारतीय संविधाना मुळेच सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असून हेच भाजपच्या डोळ्यात खुपसत असून त्यांना भारताला हिंदु राष्ट्र करून मनुस्मृति लागु करायची आहे. ढोंगी,मनुवादी,देश विरोधी बायल्या असलेल्या तुषार भोसले ला मला विचारायचं या देशात ख्रिश्चन,मुस्लीम, शीख,पारशी, बौद्ध,ज्यु,जैन इत्यादी इत्यादी धर्माचे लोक असून त्या त्या धर्माच्या लोकांनी बायबल,कुराण,गुरुग्रंथ साहेब,आगम, तोराह,झेंडा अवेस्ता,बुद्ध आणि त्याचा धम्म इत्यादी इत्यादी धर्म ग्रंथाला शालेय शिक्षणात समावेश करा अशी मागणी केली असती तर बुडाला मिरच्या लागल्या असत्या हे सांगा यला नको.भारतीय संविधानातील
1) प्रास्ताविक
2) 24 एप्रिल 1973 चा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असेल
3 ) भारतीय संविधान भाग 3 मधील धर्मस्वातंत्र्याचा हक्क मधील आर्टिकल 25,26,27,28 असेल हे सर्व धर्मनिरपेक्ष पणाचा पुरस्कार करत असून देशाला एकसंघ ठेवण्याचे काम करत आहे.भाजपचे तुषार भोसले यांच्या मागणी मुळे राष्ट्रीय एकात्मतेला तडा गेला असून त्याच्यावर भारतीय दंड विधान 124 अ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व संसदेने अशा धर्मनिरपेक्ष विरोधी वक्तव्ये करणाऱ्याच्या पार्श्वभागात चटणी भरण्याचा कायदा करावा अशी मागणी भिम टायगर सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.कारण आपल्या सर्व भारतीयासाठी जात आणि धर्मा पेक्षाही देश अत्यंत महत्त्वाचा आहे. 4 एप्रिल1938 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधीमंडळाचे सदस्य असताना विधानसभेत बोलताना म्हणाले “मी सर्वप्रथम भारतीय आहे,आणि शेवटीही भारतीय मला त्याच्या पुढे काही नाही.आणि हीच भूमिका देशातील सर्व नागरिकांची असली पाहिजे तरच त्या देशाला भवितव्य आहे. तसेच 17 डिसेंबर 1946 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत म्हणतात आपल्या देशाला एकसंघ,मजबूत बनवुन राष्ट्रीय एकात्मता जोपासयाची असेल तर जाती,गट, तट,पंथ,आणि धर्माच्या माळा घरामध्ये खुंटीला अडकवून भारताचा नागरिक म्हणून घराबाहेर पडले पाहिजेत असे स्पष्ट सांगितले होते.पण काही आई घाले देशाला नजर लावण्या साठी अशी राष्ट्रद्रोही वक्तव्ये करत असतात. त्या नालायकांना मला विचारायचे तुला चार दिवस अन्न व पाण्याशिवाय न्यायालयीन कोठडीत ठेवले आणि चौथ्या दिवशी जर तुला विचारले धर्म पाहिजेत का? अन्नपाणी? तेव्हा तुला कळेल गरज कशाची आहे. शालेय शिक्षणात धर्मग्रंथ लागू केला समज जर उद्या भारतीय सीमेवर युद्ध झाले तर घोडे,ढाल, धनुष्य,बाण मंत्र यांचा आपण वापर करणार आहोत का ? यांनी काय साध्य होणार ? उलट देश अधोगतीला लागेल भगवद्गीतेच्या बाबतीत 24 सप्टेंबर 1994 ला प्रभात टॉकीज मद्रास येथे बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पुष्कळ लोकांना भगवद्गीता धार्मिक ग्रंथ वाटतो पण मला खेदाने सांगावेसे वाटते या ग्रंथात वाटाय सारखे काहीच नाही. उलट या ग्रंथात बराच अनर्थ आहे.बुद्धीच्या कसोटीवर उतरू शकेल असे काहीच नाही.आणि म्हणून देशाला एकसंघ, मजबूत बनवुन,राष्ट्रीय एकात्मता जोपासुन आर्थिक महासत्ता बनवायचा असेल तर देशातील शालेय शिक्षणात एखाद्या धर्माचा धर्मग्रंथ नाही तर भारतीय संविधानाची गरज आहे.
अशी मागणी भिम टायगर सेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.