बीड(प्रतिनिधी) दि.२५: लिंबागणेश येथिल ज्येष्ठ शिवसेना नेते गणेश गोपाळराव मोरे (वय ३५) यांचा आज दिनांक २५ मार्च शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजता हाॅटेल बळीराजा समोर मोटार सायकल वाहन क्रमांक(एम एच २३ एस-००३४)अपघातात जागीच मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,मुलगा व भाऊ आहेत.
राष्ट्रीय महामार्ग पोलीस पोलीस नाईक ठोंबरे, म्हेत्रे, नरवणे, थोरात, जाधव ,ठोंबरे घटनास्थळी हजर झाले आहेत.मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हारूग्णालय बीड येथे पाठवला आहे.