पाटोदा तालुकाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

पाटोदा: नागेशवाडीत केमिकल पासून बनावट दूध ; ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

बीड़ (नानासाहेब ड़िड़ूळ): पाटोदा तालुक्यातील पारनेर जवळील नागेशवाडी येथे केमिकलपासून बनावट व आरोग्याला हानिकारक असे दूध तयार करून ते दुधात मिसळून ते डेअरीवर विक्री करीत असल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कार्यवाही केली.

या बाबतची माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी येथे पावडर पासून दुध आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हे केमिकल पावडर पासून मानवी आरोग्याला धोकादायक असे दूध तयार करून ते बनावट दूध त्यांच्या जवळील दुधात मिसळून दूध डेअरीवर विक्री करीत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, महिला पोलीस नाईक आशा चौरे यांना कार्यवाहीचे आदेश दिले.

आदेश मिळताच दि. २५ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ७:०० वा. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस पथकाने नागेशवाडी येथे आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हे त्यांच्या घरी बनावट व मानवी आरोग्यास धोकादायक दूध बनवीत असलेल्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी वरील अप्पासाहेब थोरवे हा आपले राहते घरी केमिकल पावडर पासून दूध तयार करत असताना तयार केलेले १६० लिटर दूध व केमिकल पावडर तसेच दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्नभेसळ अधिकारी गायकवाड यांच्या मदतीने ते बनावट व मानवी आरोग्यास धोकादायक दूध व मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाई अन्न भेसळ अधिकारी गायकवाड हे करीत आहेत.

Back to top button