बीड(शेख महेशर): बीड जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंञी म्हणून काम करताना ना.पंकजाताई मुंडे(ताईसाहेब) यांनी अठरापगड जाती – धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केलेला याची देही याची डोळा सामान्य लोकांच्या दृष्टिक्षेपात दिसत असल्याने लोकसभा निवडणूकीत महायुती च्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांना रायमोहा व बारा वाड्या परिसरातून प्रचंड मताची लिड देणार असल्याचे भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हाउपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस गोकुळ सानप यांनी पञकात म्हटले आहे. रायमोहा व बारा वाड्या परिसरातून भाजपा बीड जिल्हा सरचिटणीस तथा माजी उपनगराध्यक्ष अॅड.सर्जेराव तांदळे यांच्या नेतृत्वाखाली भरघोस मतदानाची लीड देण्याचा संकल्प येथील युवकांनी केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या रणाधुमाळीत अठरापगड जाती धर्माचे लोक आता महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी पुढे येताना दिसत आहेत, सामान्य माणूस मुंडे भगिनींनी केलेल्या विकासाला प्रतिसाद देत आहे. मागील लोकसभा निवडणूकीत खासदार मुंडे यांनी विश्व विक्रमी मतानी विजय मिळवला होता,हाच विजयाचा आत्मविश्वास कायम ठेवून या निवडणूकीत खासदार प्रितमताई मुंडे विजयी होणार आहेत मागील साडेचार वर्षात अनेक विकासाची कामे खासदार मुंडे यांनी केलेले आहेत. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना रायमोहा व बारा वाड्याच्या परिसरातुन मतांची प्रचंड लिड देऊन विजयी करण्याचा निर्धार सर्व सामान्य जनतेने केलेला आहे तसेच नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा भारत देशाचे पंतप्रधान करण्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना व मिञ पक्षा च्या उमेदवार खासदार प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतानी विजयी करण्याचे आवहन भाजपा विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हाउपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे बीड जिल्हासरचिटणीस गोकुळ सानप यांनी दिलेल्या पञकातून म्हटले आहे.