बीड दि.०५ (प्रतिनिधी): बीड लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवतांना राष्ट्रवादी पक्षाच्या पुढार्याकडे विकासाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी एकही मुद्दा नसुन जाती पातीच्या राजकारणाला नेहमी प्रमाणे त्यांनी सुरूवात केली आहे. आमच्याकडे मात्र ना.पंकजाताई व डॉ.प्रितमताई यांनी पाच वर्षात केलेल्या भरीव विकास कामाची पुण्याई अर्थात विकास हाच मुद्दा आहे,त्याच बळावर आम्ही गेवराई विधानसभा मतदार संघातून प्रचंड मतािधक्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास गेवराई मतदार संघाचे आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी बोलून दाखवला.
बीड लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारासाठी बंगाली पिंपळा येथे आयोजीत केलेल्या सभेत ते बोलत होतेे, पुढे बोलतांना लक्ष्मण आण्णा पवार यांनी विरोधकांचा भरघोस समाचार घेतला. आम्ही आल्यानंतर या मतदार संघात काय करून दाखवले हे याची देही याची डोळा जनतेला दिसत असुन बीड जिल्ह्यात वर्षानुवर्षे जो प्रश्न रेंगाळत पडला होता तो बीड-नगर-परळी रेल्वेचा प्रश्न मुंडे भगिनीमुळे अवघ्या एका वर्षात मार्गी लागला. बीड जिल्ह्याच्या सिमेवर रेल्वे येवून धडकली तरी पण आमचे विरोधक जिल्ह्यात रेल्वे आलीच नाही अशी टिका करतात ज्यांना असे वाटते त्यांनी परळी पर्यंत जावून यावे आणि रस्त्याच्या कामाची पाहणी करावी असा सवाल त्यांनी केला.
आज बीड जिल्ह्यातील दर्जेदार रस्त्यावर विरोधकांच्या गाड्या धावतात तेंव्हा या लोकांनीच खर्या अर्थाने रस्त्यात आपले चेहरे पाहिले तर विकास काय असतो हे त्यांना कळेल असा टोमना पवारांनी मारला. चांगले काम करणार्याच्या पाठीमागे बीड जिल्ह्यातील जनता खंबीरपणे उभी राहते हा आजवरचा अनुभव असुन स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व यामुळेच लोकांनी स्विकारले.गेवराई मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ना.पंकजाताई मुंडे व प्रितमताईंने केलेले सहकार्य लाख मोलाचे असुन भविष्यात या मतदार संघात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही.लोकांनी विरोधकांच्या अपप्रचाराला व जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता या निवडणूकीत डॉ.प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बंगाली पिंपळा येथे झालेल्या जाहीर सभेत सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे,रासपा नेते परमेश्वर वाघमोडे,दादासाहेब गिरी,महेश दाभाडे,मधुकर वादे,मुन्ना सेठ,सरपंच मावसकर,पप्पु खेडकर,उध्दव मडके,लक्ष्मण गिरी,इम्रान पठाण आदींची उपस्थिती होती.