सकाळी चंद्रपुर भंडारा, तर सायंकाळी बीड जिल्ह्यात, ना.पंकजाताईंच्या सभेची मागणी वाढली.

ताई तुम्ही आमच्या प्रचाराला या, आम्ही निवडून येतो..!

बीड दि.०५ (प्रतिनिधी): लोकसभा निवडणूकीत राज्यातील महायुतीच्या स्टार प्रचारक जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या सभेला राज्यातून मागणी वाढत आहे.ताई तुम्ही आमच्या प्रचाराला या, आम्ही निवडून येतो असे म्हणत उमेदवाराचा आग्रह वाढल्याने ना.पंकजाताई राज्यभरात झंजावती प्रचार दौरा करतांना दिसत आहेत.सकाळी चंद्रपुर भंडारा तर सायंकाळी बीड जिल्ह्यात अशा त्यांच्या जाहिर सभा होत असुन बाहेरच्या जिल्ह्यात त्यांच्या सभेमुळे पडणारा फरक केंद्रात नरेंद्र मोदीचे सरकार आणण्यासाठी महत्वाचा ठरत आहे.बीड जिल्ह्यातही त्यांची सभा आली म्हणताच हजारोंची उपस्थिती व लोकांचा मिळणारा प्रतिसाद बरेच काही सांगुन जातो.
लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच राजकीय पक्षाची रेलचेल सुरू असुन राज्याच्या ग्रामिवकास मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे ह्या स्टार प्रचारक म्हणून ओळखल्या जातात.राज्याच्या काना कोपर्‍यात त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होत असुन ताई तुम्ही आमच्या प्रचारात या,आम्ही निवडून येतो असे म्हणत अनेक लोकसभा मतदार संघात त्यांच्या सभेची मागणी वाढत आहे.केंद्र सरकारच्या योजनेची माहीती,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात केलेली कामे राज्य सरकारच्या कामाची उपलब्धी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामिगरी आणि विरोधकांच्या राजकीय भांडवलावर हल्लाबोल हे सारे करण्यात पंकजाताई सध्या आघाडीवर असुन राष्ट्रवादी पक्षाला सळो की पळो करून त्यांनी सोडले आहे.जाहिर सभेतून वैचारीक पातळीवर ते मांडत असलेले मुद्दे सर्वसामान्य लोकांना पटत असल्याने त्यांची एक सभा म्हणजेच विजयावर शिक्का अशा प्रकारचे चित्र दिसत आहे.आज त्यांनी विदर्भात जाऊन चंद्रपुर,भंडारा आदी ठिकाणी जाहिर सभा घेतल्या तर अनेक ठिकाणी जनसंवाद साधला.सकाळी विदर्भात तर सायंकाळी बीड जिल्ह्यात असा त्यांचा दौरा आहे.नगर जिल्ह्यात नव्याने आलेले सुजय विखे पाटील यांनीही जाहिर सभेसाठी त्यांना अामंत्रित केले असुन खांदेश,पश्चिम महाराष्ट्र,नाशिक आदी भागात त्यांच्या झंजावती सभा होणार आहेत.बाहेरच्या लोकसभा मतदार संघातील जनतेच्या मनावर त्यांच्या जाहिर सभेने होत असलेले परिवर्तन लक्षणीय आहे.बीड लोकसभा मतदार संघात गेल्या आठ दिवसापासून त्यांनी जाहिर सभेचा सपाटा लावला असुन प्रत्येक सभा हजारोच्या उपस्थतीत होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणल्याचे चित्र सध्या दिसत आहे.दिवसा राज्यात सभा,सायंकाळी बीड जिल्ह्यात सभा आणि रात्री जनसंपर्क भेटी हे त्यांचे प्रचार यंत्र पाहील्यानंतर बीड जिल्ह्यातील लोकांना स्व.गोपीनाथ मुंडे यांची आठवण येणे सहाजीकच आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.