आठवडा विशेस टीम –
बीड शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सदरचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी संबंधितांना सूचना केल्यानंतर भारतातील सर्वात अत्याधुनिक मशिनद्वारे हे काम सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिमेंट रस्ता बनवणार्या भारतातील सर्वात अत्याधूनिक असलेल्या व्हर्टिजेन एसपी ६४ याद्वारे हे काम सुरू करण्यात आले आहे. या मशीनमुळे सदरचे काम प्रत्येक दिवशी पाच मिटर रुंद आणि चारशे मिटर लांबीचे काम होणार आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सिमेंट कॉंक्रेटचे काम दिवसा करणे शक्य नाही त्यामुळे हे काम रात्रीच्या वेळेत जलदगतीने सुरू आहे. शांताई हॉटेल ते सोमेश्वर मंदिर इथपर्यंतचा हा रस्ता अवघ्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत पुर्णत्वाकडे जाईल. आ. क्षीरसागरांनी सदरचा रस्ता व्हावा यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्याअनुषंगाने हा रस्ता मंजूर होऊन त्या रस्त्याचे प्रत्यक्षात जलदगतीने काम होत असल्याने शहरवासीय आणि त्या भागातील व्यापार्यात आनंद व्यक्त केला जात आहे.