आठवडा विशेष|ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.२४ :भारतीय राज्य घटनेचा जगात नाव लौकिक असून युवा शक्ती हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे युवाशक्तीला राष्ट्रीय संत महात्मे यांच्या विचारांची शिकवन देऊन राष्ट्र बलाढ्य करण्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी हनुमंतखेडा (ता.सोयगाव) येथे रविवारी (दि.२४) केले.
ऍड. उमाकांत पाटील (उपाध्यक्ष मराठवाडा लीगल अँड जनरल एजुकेशन सोसायटी, औरंगाबाद) यांच्या अध्यक्षतेखाली हनुमंतखेडा ता. सोयगाव येथे रविवारी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय औरंगाबाद व सेवा संकल्प जनकल्याण प्रतिष्ठाण हनुमंतखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विधी साक्षरता महाशिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर सोयगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस साळवे, प्रसाद मिरकले उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग जी.प. औरंगाबाद,गटविकास अधिअकारी सोयगाव प्रकाश जोंधळे, ऍड.अशोक ठाकरे,मा. प. विधी महाविद्यालय प्राचार्य डॉ. सी एम राव, वकील संघ जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, विधीज्ञ ऍड.गणेश पवार, वकील संघ सोयगाव अध्यक्ष योगेश जावळे, पाचोरा ता. वकील संघ अध्यक्ष प्रवीण पाटील, सिल्लोड वकील संघ उपाध्यक्ष संतोष झाल्टे, विधीज्ञ ऍड. प्रतीक अग्रवाल, सेवा संकल्प जनकल्याण प्रतिष्ठाण अध्यक्ष राजेंद्र राठोड, मा.प. विधी महाविद्यालय समन्वयक दिनेश कोलते, ऍड प्रदीप लोहिया, ऍड कल्याणी देशमुख, प्रा. गजानन खेचे, ऍड सागर रसाळ व रोहित काळे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख अतिथी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी देशाच्या विकासासाठी युवा शक्तीने येण्याची आवाहन करत सबळ सहभागासाठी सजग सक्षम सामाज निर्माण करण्यासाठी संघटन करण्याचे प्रतिपादन केले.त्याच प्रमाणे ऍड अशोक ठाकरे यांनी मध्यस्थाच्या भूमिकेतून गावातील छोटे मोठे प्रकरणे गावातच सामंज्यस्यपणे मिटवून आपला अमूल्य वेळ व पैशाची बचत करावी असे सांगितले.
यावेळी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय औरंगाबादच्या विद्यार्थयांनी जनजागृतीपर बळीराजा आता लढायला शिक, माझं मत माझा अधिकार, बालविवाह, अंधश्रद्धा निर्मूलन व दारू सोडा संसार जोडा हि पथनाट्य सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रामाचे सूत्रसंचालन वाडीलाल राठोड यांनी केले तर प्रस्तावना प्रा. दिनेश कोलते व आभार मयूर सुभेदार यांनी मांडले. या कार्यक्रमास गोंदेगाव, बनोटी विभागातील विद्यार्थी,महिला बचत गट व विविध संघटनेच्या प्रतिनिधीसह ग्रामस्थानची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.