टीम आठवडा विशेष : यूपीएससी परीक्षेच्या मुलाखती ४ फेब्रुवारी २०१९ ला झाल्या होत्या. त्यानंतर हा निकाल आला आहे. हा निकाल तुम्हाला upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. युपीएससी परीक्षेत कनिष्ट कटारिया भारतातून पहिला आला आहे तर अक्षत जैन आणि जुनैद अहमद यांचा दुसरा आणि तिसरा क्रमांक आला आहे. महाराष्ट्राची सृष्टी जयंत देशमुख देशातून पाचवी आली असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्थरांवरून अभिनंदन होत आहे.
आयएएस, आयपीएस, आयएफएस सारख्या विविध सेवा-नियुक्तीसाठी ७५९ उमेदवार (५७७ पुरुष व १८२ महिला) यांची आयोगाने शिफारस केली आहे.