गेवराई तालुकाबीड जिल्हाराजकारण

अभ्यासाचे ढोंग करणाऱ्या सरकाराला निवडणुकीच्या परीक्षेमध्ये नापास करा―विजयसिंह पंडित

फडणवीस व मोदी सरकार म्हणजे राघोबादादा पेशव्यांची औलाद―सक्षणाताई सलगर

गेवराई दि.५: मंत्रिमंडळाच्या पहील्याच बैठकीमध्ये धनगरांना एस. टी. प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ म्हणणाऱ्या फडणवीस सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केला असून फडणवीस व मोदी सरकार म्हणजे राघोबादादा पेशव्यांची औलाद आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रेदश अध्यक्षा सक्षणाताई सलगर यांनी केले तर फसव्या घोषणा देऊन अभ्यासाचे ढोंग करणाऱ्या या ढोंगी सरकाराला लोकसभा निवडणुकीच्या परीक्षेमध्ये नापास करा असे प्रतिपादन माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आय काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या ईटकूर येथील प्रचार सभेत बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस(आय),स्वाभिमानी शेतकरी संघटना,रिपाई (कवाडे गट), मानवी हक्क अभियान व मित्र पक्ष आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रेदश अध्यक्षा सक्षणाताई सलगर यांच्या उपस्थितीत उपस्थितीत गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे ईटकूर येथे जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, फुलचंद बोरकर, राजेंद्र वारंगे, जालिंदर पिसाळ, शांतिलाल पिसाळ, प्रा.गणपत काकडे, ऋषिकेश बेदरे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, फडणवीस व मोदी सरकारने आरक्षण व विकास यांच्या नावाने भोळ्या - भाबड्या धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे. कांदा, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना भाव दिला नाही..आँनलाईन कर्जमाफीच्या नावाखाली शेतकरी राजाची लुट केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष शेतकर-यांनात्र 'रडतात साले' म्हणून अपमान करतात. स्वतःला मनातला मुख्यमंत्री म्हणून घेणार्यांनी धनगर समाजाचा उपयोग कढीतील कडीपत्याप्रमाणे चवी पुरता केला आहे. धनगर समाजाला आपले गुलाम समजून जिल्हा परिषदेतील सर्व पदे हे स्वतः च्या समाजातच दिले आहेत. हेलिकॉप्टरने फिरुन स्वतः ला गरीब म्हणने मुंडे भगिनींनाच जमते. खरे बोलणार्यांचे मोतिबिंदूचे आँपरेशन करण्यापेक्षा मूंडे बहीनीनींच एकीमेकीचे आँपरेशन करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

विजयसिंह पंडित म्हणाले कि, देशाच्या भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशिर्वादाने सत्तेत येऊन या दोन्ही महापुरुषांचा अपमान केला आहे. छत्रपतीच्या नावाने कर्जमाफी योजना सुरु करुन प्रत्यक्षात लाभ मात्र दिला नाही. शेतकर्यांना आँनलाईन च्या नावाने छळून जेरीस आणले आहे.शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे फक्त राजकारणच केले आहे. उद्योगपतीसाठी पायघड्या घालून त्यांच्या पूढे पुढे केले जाते. याऊलट बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेण्याऐवजी अभ्यासाचे ढोंग करुन वेळेकाडूपणाचे धोरण अवलंबवले जाते. अशा या ढोंगी व ऊद्योगपती धार्जीन्या सरकाराला जनतेने निवडणूकीच्या परिक्षेत नापास करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंदर आण्णा पिसाळ यांनी केले. यावेळी बबनराव मुळे, मनोज श्रीराम, जयसिंहराव जाधव, वसीम फारुख, संदीप मडके, दत्ताभाऊ हाकदार, दत्ता पिसाळ. बालिका सिराम, नंदाताई खांडेकर,.आशाताई मासाळ, गणेश जाहिर, गोविंद शिंदे, लहू लोखंडे, डिगांबर मासाळ,माणिक मासाळ,वसंत ढेंगळे, दादा खांडेकर, शिवाजी मासाळ, सुनील ढेंगळे, सिध्देश्वर जाहिर, भागवत ढेंगळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाचे पदाधिकारी व मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.