अंबाजोगाई, माजलगावला होणार प्रा.विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
अंबाजोगाई(प्रतिनिधी) दि.०६: आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ राष्ट्रिय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे अंबाजोगाई येथे रविवार, दि.७ एप्रिल २०१९ रोजी जाहीर सभेसाठी येणार असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची लाट आहे.भारिप बहुजन महासंघ,एम.आय.एम. आय.एम.,रिपब्लिकन सेना,डीपीआय, सत्यशोधक बहुजन सेना,महाराष्ट्र विकास आघाडी,मल्हार सेना, युवा आंदोलन,युवा भिम सेना,सम्यक विद्यार्थी आंदोलन,विद्रोही युवा मंच,अखिल भारतीय कैकाडी महासंघ, नाभिक समाज संघटना, चर्मकार समाज संघटना,अखिल भारतीय सोनार समाज संघटना,बसव परिषद,गोर सेना,भिल्ल समाज संघटना,वडार समाज संघटना आदी विविध राजकिय पक्ष व सामाजिक संघटनांची मिळून वंचित बहुजन आघाडी बनली आहे.
राज्यात सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी चांगल्या मताधिक्याने जिंकणार आहे.राष्ट्रिय नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी त्यांना बळ द्यायचे आहे.अंबाजोगाई शहरातील मोंढा मैदान या ठिकाणी आज रविवार,दि.७ एप्रिल २०१९ रोजी दुपारी ३ वाजता तर माजलगावला मोंढा मैदान येथे दुपारी १ वाजता वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांच्या प्राचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.अंबाजोगाई येथे पद्मश्री लक्ष्मण माने(राज्य प्रवक्ते,वंचित बहुजन आघाडी), अॅड.आण्णाराव पाटील (महाराष्ट्र विकास आघाडी),फिरोज लाला (मराठवाडा अध्यक्ष, ए.आय.एम.आय.एम),प्रा.किसन चव्हाण (राज्य निमंञक,वंचित बहुजन आघाडी),राजेंद्र क्षीरसागर (राज्य नेते,सत्यशोधक बहुजन सेना),अजिंक्य चांदणे (राज्य नेते,डी.पी.आय.)हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी राष्ट्रिय नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या होणाऱ्या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे वंचित बहुजन आघाडीने केले आहे.