अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―तालुक्यातील घाटनांदुर येथील गुरूदास सार्वजनिक ग्रंथालयात वि.वा.शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणुन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.आर.ए.चौधरी (धर्मापुरी), कवी वामन जयवीर, साहित्यीक दत्ता वालेकर,स.तु.जाधव यांची तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र नरहरी मंठेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रा.राम चौधरी यांनी सांगितले की,आजचे युग स्पर्धेचे आहे.मराठी भाषेवर इतर भाषा हावी होत आहेत.तेंव्हा अशा काळात मराठी भाषेचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. अन्यथा दिवसेंदिवस प्रमाण भाषा लुप्त होण्याची शक्यता आहे.त्यामुळे मातृभाषेची आस्मिता सर्वांनी जपली पाहिजे,मराठी ही इतर भाषेपेक्षा समृद्ध आहे व ती अनेक कवी, साहित्यीक यांनी समृद्ध केली आहे.कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी आज मराठीचा गौरवदिन आपण साजरा करत आहोत.नव्या पिढीने मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन प्रा.राम चौधरी (धर्मापुरी) यांनी केले.यावेळी गुरूदास सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय समारोप ग्रंथमित्र नरहरी मंठेकर यांनी केला.तर या प्रसंगी कवी वामन जयवीर, दत्ताञय वालेकर,सतिष जाधव यांनी आपल्या कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ताञय वालेकर यांनी करून उपस्थितांचे आभार ग्रंथमित्र नरहरी मंठेकर यांनी मानले.या कार्यक्रमास गुरूदास ग्रंथालयाचे सभासद,वाचक,बालवाचक, महिला वाचक आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.