मुंबई दि.०७ (प्रतिनिधी): विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे हे रविवार दिनांक ७ एप्रिल व सोमवार दिनांक ८ एप्रिल असे दोन दिवस विदर्भ व मराठवाड्यात दौ-यावर असून ते या दोन दिवसात विदर्भ व मराठवाड्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांसाठी एकूण ९ प्रचार सभा घेणार आहेत.
रविवार दिनांक सात एप्रिल रोजी श्री मुंडे हे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघात मिळून एका दिवसात चार सभांना संबोधित करणार आहेत.
सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ते वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार चारूलसा टोकस यांच्या प्रचारार्थ सकाळी आष्टी जिल्हा वर्धा येथे त्यानंतर दुपारी एक वाजता वाशिम येथे श्री माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ, दुपारी ३ वाजता हिंगोली लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी तर त्यानंतर साडेपाच वाजता चौंडी जिल्हा नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार श्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. रात्री आठ वाजता मुखेड येथे ही त्यांची जाहीर सभा होणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.