खा.डॉ.प्रितमताईंच्या मताधिक्यसाठी करणार प्रयत्न
परळी वैजनाथ दि.६: डाबी गावचे माजी सरपंच, बंजारा समाजाचे नेते नाथराव जाधव यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या गलथान कारभाराला कंटाळून पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
नागनाथ जाधव गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये काम करीत होते, त्यांचा बंजारा समाजात मोठा संपर्क आहे.
मात्र तेथे नेतृत्वाकडून योग्य न्याय मिळत नसल्याने पक्षाच्या गलथान कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीला रामराम ठोकून आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. यशश्री निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जाधव म्हणाले की, ना. पंकजाताई व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे जिल्ह्यात विकासाला गती दिली आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपात प्रवेश केला असून खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, जेष्ठ नेते श्रीहरी मुंडे, अंकुश मुंडे, दत्ता मुंडे, पप्पू चव्हाण, सुर्यभान पवार, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते.