आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.०६:लोकसभा निवडणुका दरम्यान आचारसंहितेच्या बाबतीत हयगय सहन केल्या जाणार नाही.सोयगाव तालुक्यातील औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदार संघातील गावात वाहनांची कसून चौकशी करण्यात यावी तसेच यामध्ये दोषी आढळल्यास आचारसंहिता पथकांवर कारवाई केल्या जाईल अश्या स्पष्ट सूचना आचारसंहिता पथकाच्या निरीक्षक पी.के सिंग यांनी आचारसंहिता पथकांच्या तीनही बैठे पथकांच्या भेटीदरम्यान शुक्रवारी दिल्या.
सोयगाव तालुक्यात दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या गावांसाठी सहा पथके तैनात करण्यात आले असून पथक निरीक्षक पी.के सिंग यांनी तालुक्यातील वरठाण,बनोटी,सोयगाव आणि फर्दापूर फाट्यावरील बैठे पथकांच्या कामकाजाचा आढावा घेवून त्यांना निवडणूक विषयक महत्वपूर्ण सूचना दिल्या.यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,कन्नड विभागाचे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मकसूद शेख,प्रभाकर गवळी, सोयगावातील आचारसंहिता पथकाचे डॉ.छातृघ्न भोरे आदींची यावेळी उपस्थिती होती,दरम्यान निवडणूक काळात चोवीस तास सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.