परभणी दि.०७ : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते आहेत अशी घणाघाती टीका बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेता म्हणजे सेटिंग आणि तोडपाणी करणारे असेही ना.पंकजाताई मुंडे म्हणाल्या. परभणीचे युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी जिंतूर येथील सभेत त्यांनी ही टीका केली.
“गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणले होते. पण आत्ताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात. ते आणि त्यांचे आमदारही तोडपाणी करतात, तोडपाणी करणारे गोपीनाथ मुंडेचे वारस होऊ शकत नाहीत” असा घणाघात पंकजाताई यांनी केला.
मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले.राष्ट्रवादीने अनेक घरांत भांडणे लावण्याचे काम केले आहे. आमचे उदाहरण तर जगजाहीरच आहे.असेही त्या यावेळी म्हणाल्या.