पाटोदा:आठवडा विशेष टीम―पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी गावातील जनतेने उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आज अमर उपोषण पुकारले आहे.
ग्रामस्थांनी गावातील अनेक गैरकारभारविरुद्ध उपोषण पुकारले आहे,त्यामध्ये ढाळेवाडी ग्रामपंचायतच्या १४वित्त आयोगाचा निधीचा लेखाजोखा मिळाला नाही तो आम्हाला मिळाला पाहिजे, वृक्षारोपण व संवर्धनासाठी जो निधी मंजूर झाला त्याच्या हिशोब दिला जावा, गावातील शासकीय पाणीपुरवठा विहरींची चौकशी व्हावी,गावाला गेले चार महीने पाणी नाही,या परिस्थितीची कुणीही दखल घ्यायला तयार नाही, गावामध्ये वेळेवर लाईटची सोया होत नाही, गावातील विकामांसाठी आलेल्या निधीचा चोख हिशोब मिळावा,गावाला उपसरपंच नसल्याने त्यांची कामगिरी ही उपसरपंच बाजावत आहेत,व गावातील विकासकामाचा निधी उपसरपंच ग्रामसेवक व गावातील अन्य व्यक्तींच्या सहमतीने गैरकारभार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे त्यामुळे याची प्रशाकीय स्थरावर चौकशी व्हावी व कायद्यानुसार योग्य ती दंडात्मक कारवाही दोषीवर करण्यात यावी.