धुळेब्रेकिंग न्युजराजकारण

अनिल गोटे यांचा आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा,उद्या भरणार लोकसभेसाठी अर्ज

धुळे दि.०८(प्रतिनिधी): ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा आज सोमवारी राजीनामा दिला असल्याचं सुत्रांमार्फत समोर येत आहे. धुळे महानगरपालिका पासून नाराज असलेल्या अनिल गोटे यांनी अखेर आज आमदारकी सह भाजप पार्टीच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.अनिल गोटे उद्या मंगळवारी लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल करणार आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    आपण आजही मोदिंचे समर्थक असून माझा केवळ मोदींच्या नावाने वाईट उद्योग करणाऱ्यांना विरोध असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले. आपल्या आमदारकीचा राजीनामा देताना अनिल गोटे यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली. पक्षा अंतर्गत राजकारणाचा कंटाळा आल्याचे त्यांनी सांगितले.याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली पण त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे समजते. गोटे यांनी याआधी अनेक वेळा त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.आज अनिल गोटे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे.भामरे-गोटे-काँग्रेसचे कुणाल पाटील पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.