बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

जातीपेक्षा देशहिताला प्राधान्य द्या - ना. पंकजाताई मुंडे यांनी साधला परळीतील वकीलांशी संवाद

विरोधकांनी प्रचाराची पातळी सोडल्याबद्दल व्यक्त केली खंत

परळी दि.०८: विकासाबद्दल बोलायला जागा नाही म्हणुन विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विरोधक समाजामध्ये जातीभेदाचे विष पेरण्याचे पाप करीत आहेत मात्र आता जातीपेक्षा देशहिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. सामान्य माणसालाही नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते म्हणून आपणही कोणत्याही चुकिच्या प्रचाराला बळी न पडता खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी वकील संघाला केले.

बीड लोकसभेच्या भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती सेनेच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई यांच्या प्रचारासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी आज वकील संघाच्या कार्यालयात वकिलांशी संवाद साधला. प्रारंभीच मी भाषण नाही तर संभाषण करायला आल्याचे स्पष्ट केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची प्रतिमा येथे पाहुन भारावून गेल्याचे सांगुन त्या म्हणाल्या की, मी कुणालाही न दुखावता राजकारण करते मुंडे साहेबांनी आयुष्यात कधी जात पाहिली नाही आणि आम्ही बहिणींनी कधी जात पाहिली नाही. मात्र विकासावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीकडे बोलण्यासारखे काही नसल्याने त्यांनी पातळी सोडून प्रचार सुरू केला आहे. मात्र आता जातीपेक्षा देशहित महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही सामान्य माणसाची इच्छा आहे आपणही देशहित आणि विकासाला साथ देण्यासाठी आमच्या पाठीशी आशिर्वाद ठेवावेत असे आवाहन त्यांनी केले.

आम्ही जिल्ह्याच्या विकासाला गती दिली आहे. परळी - बीड - नगर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. रेल्वे मार्ग झाला की उद्योग वाढणार आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार झाले आहे. त्यामुळे विकासाला गती आली आहे. आगामी काळात कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला मिळविण्यासाठी आणि गोदावरीचे पाणी सिंधफणा नदीत आणण्यासाठी नियोजन चालू आहे विकासाच्या बाबतीत आम्ही बहिणी कमी पडणार नाहीत कारण मी चमचेगिरी करून पुढे आलेले नाही असे सांगून स्वाभिमानी जनता आपल्या लेकीला ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजयी करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपली लेक म्हणुन आपण खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या पाठीशी आपले मतदानरुपी आशीर्वाद कायम ठेवा असेही त्या म्हणाल्या.

आम्ही सुशिक्षित असुन विकास करण्याची क्षमता कोणात आहे याची आम्हाला जाणीव आहे. जातीपातीचा विचार न करता आम्ही खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच विजयी करू असा शब्द वकील संघाने दिला. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष पी. एम. सातभाई, प्रकाश मराठे, एच. व्ही. गुट्टे, व्ही. एस. फड़, गोलेर,आर. व्ही. देशमुख, जीवनराव देशमुख, कडबाने, सुभाष गिते, परमेश्वर गिते, पाळवदे मॅडम, शुभांगी गिते, सोनिया मुंडे, संध्या मुंडे, उषा दौंड, जे. एस. मुंडे, दत्ता आंधळे, अनंतराव जगतकर, अमोल सोलंके, व्ही. एच. टेकळे, मिर्जा मंजूर अली, शफ़ीक़, विजय धूमाळ, पी. सी. गिराम, सायस मुंडे, केशव अघाव, पोदार, माऊली मुंडे, सोनपीर, लक्ष्मण मुंडे, मोहन कराड, अर्जुन सोळंके के, अश्विन सालवे, रुद्र कराड, नागपुरकर, प्रविण फड़, अरूण पाठक, संजय डिघोळे, आदींसह सर्व वकीलमंडळी उपस्थित होती.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.