ब्रेकिंग न्युजराजकारणराष्ट्रीय

उद्या भरणार देशभरात चर्चेत असलेले कन्हैया कुमार बेगूसराय लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज

बेगूसराय(बिहार) दि.०८: लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये कन्हैया कुमारला महाआघाडीकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती.जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठाचा (जेएनयू दिल्ली) माजी विध्यार्थी संघ अध्यक्ष तसेच एआयएसएफ या विध्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) तिकिटावर उद्या मंगळवार दि.०९ एप्रिल २०१९ रोजी बिहार मधील 'बेगूसराय' लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरणार आहे.

एआयएसएफ या संघटनेचा नेता कन्हैया कुमार आता निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. कन्हैया कुमार बिहारच्या ‘बेगुसराय’ मधून लोकसभा निवडणूक लढवणार असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (भाकप-CPI) उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, कन्हैया कुमारला महाआघाडीकडून उमेदवारी देण्यात आली नसल्याकारणाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्याला उमेदवारी जाहीर केली होती.याबाबतची घोषणा बिहार राज्यचे सचिव सत्यनारायण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.कन्हैया कुमार बेगुसराय लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढविणार असल्याने या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे.राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन आणि भाजपाचे गिरिराज सिंह यांच्याशी कन्हैया कुमारला सामना करावा लागणार आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    कन्हैय्या कुमार ची राजकिय वाटचाल-

    कन्हैया कुमारने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील निवडणुकांमध्ये यशस्वी राजकीय वाटचाल केली होती.त्यामुळे त्याची तरुणांमध्ये राजकीय युथ आयकॉन म्हणून ओळख निर्माण झाली आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.