आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.०९:सोयगाव तालुक्यातील निंबायतीकडे येणाऱ्या राज्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला दिशाच न मिळाल्याने तासभर हवेतच हेलिकॉप्टरच्या घिरट्यानी सोयगाव परिसर पिंजून काढला त्यामुळे उष्ण हवेतच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना तासभर हवेतच राहण्याची वेळ आली होती.
दरम्यान, हेलिकॉप्टर लँड होण्यासाठी रात्री वेगळे आणि सकाळी वेगळे असे दोन लोकेशन मिळाल्याने हा घोळ झाल्याचे पायलट एम.बॉबी यांनी सांगितले
भाजपाच्या प्रचार सभेसाठी मुंबईवरून केस्टल एव्हीएशन कंपनीचे खासगी हेलिकॉप्टर निंबायतीकडे येत असतांना या हेलिकॉप्टरच्या पायलटला रात्री सोयगाव आणि मंगळवारी सकाळी रामपुरा असे वेगवेगळे दोन लोकेशन मिळाल्याने पायलट हेलिकॉप्टरसह सोयगाव आणि गलवाडा गावावारच घिरट्या घालत असल्याने तासभर जिल्ह्याच्या नकाशातच नसलेले रामपूरा हे लोकेशन न मिळाल्याने गोंधळ उडाला होता,दरम्यान तासभर या हेलिकॉप्टरला हवेतच तरंगून राहावे लागल्याने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मात्र हवेतूनच रामपुरा गावाचा शोध घेण्याची वेळ आली अखेरीस रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष विनायक पाटील,सुरेश बनकर,ज्ञानेश्वर मोठे,कैलास काळे,यांचेसह संबंधित यंत्रणेचे अधिकारी यांनी धूर करून हेलिकॉप्टरला अजिंठ्या डोंगराच्या पायथ्याजवळ रामपुरा गावाचे लोकेशन दिल्याने तासभरनंतर हेलिकॉप्टर लँड झाल्यावर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुटकेचा श्वास घेतला होता.