जळगाव जिल्हापाचोरा तालुका

सिद्धांतांवर आधारित भारतीय संस्कृतीला गौरवशाली त्यागाचा इतिहास- प्रा.जोगेंद्र सिंह बिसेन

पाचोरा येथे गुढीपाडव्यानिमित्त संघाचे पथसंचलन उत्साहात

पाचोरा(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): भारतीय संस्कृतीला गौरवशाली परंपरा असून हजारो तपस्वी साधुसंत आणि विचारवंतांच्या त्याग भावनेच्या संस्कारातून निर्माण झालेल्या या संस्कृतीला भक्कम सैद्धांतिक अधिष्ठान आहे. विश्वातील सर्वात प्राचीन असलेल्या भारतीय संस्कृती नंतर अनेक भोगवादी संस्कृतीं आल्या आणि लयास गेल्या मात्र त्याग समर्पण शिकवणारी परिवर्तनशील भारतीय संस्कृती अनेक आक्रमणानंतर सर्व व संकटांचा सामना करून विस्तारली आहे. असे प्रतिपादन प्रा योगेंद्र सिंह बिसेन (लातूर )यांनी केले .पाचोरा स्वामी लॉन्स येथे भारतीय गौरवशाली संस्कृती या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. हिंदू नववर्ष स्वागत समितीने आयोजित केलेला कार्यक्रम काल सायंकाळी आठ वाजता संपन्न झाला. हिंदू नववर्ष स्वागत समिती पाचोरा व इतिहास प्रबोधन संस्था (महा) आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी चे डॉक्टर भूषण मगर तसेच व्यासपीठावर रा स्व संघाचे तालुका संघचालक मनीष काबरा ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष डॉक्टर अनिल देशमुख प्रथितयश कवी प्रकाश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

व्यासपीठाचा व सत्कारथीच्या परिचय श्री रवींद्र पाटील यांनी केला यावेळी प्रा. बिसेन यांनी भारतीय विक्रम समवत्सरापासून तसेच हिंदू पंचांगानुसार मानण्यात ,येणाऱ्या हिंदू नववर्ष म्हणजे वर्षप्रतिपदा या आरंभ तिथि विषयी विज्ञानवादी दाखले देऊन विषयाची यथार्थता पटवून दिली. धार्मिक अधिष्ठान असलेली भारतीय संस्कृती विज्ञानवादी असून या संस्कृतीने शांतीचा संदेश दिला आहे.या संस्कृतीत नारी जातीला सन्मानाचे स्थान असून एकता समानता या मूल्यावर आधारलेली ही संस्कृती त्याग समर्पण आणि संवेदनशीलता शिकवते असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरिष बर्वे यांनी मांडले. प्रसंगी कला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभूतींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये विशाल सोनकुळ अरुणा उदावंत संजय राजगुरे संगीत विशारद गोविंद मोकाशी दीपक हिरे प्रतिभा उबाळे मनोहर पवार आधारवड संस्थेचे प्रवीण पाटील भूषण देशमुख बबलू रायगड रवींद्र देवरे महेंद्र अग्रवाल आधी सर्व पदाधिकारी यांचा समावेश होता. तत्पूर्वी नादब्रह्मा संगीत विद्यालयाचे गोविंद मोकाशी आणि सहकारी यांनी देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी रा स्व संघ प्रांत मंडळ सदस्य सुनील सराफ मधुकर काटे सतीश शिंदे डॉक्टर संजीव पाटील सुनील पाटील गोविंद शेलार डॉक्टर अतुल महाजन डॉक्टर प्रविण माळी डॉक्टर हरणे डॉक्टर काळे दत्ता पाटील तालुका कार्यवाह संतोष माळी संतोष मोरे अतुल देशमुख रवी पाटील योगेश जडे राजू बाळदकर राजू घोडके योगेश सोनार हर्षल पाटील विनोद ठाकुर रवींद्र पाटील कृष्णा पाटील किरण पांडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पुरुष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी तर महेंद्र मिस्त्री यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.