पाटोदा तालुकाबीड जिल्हाराजकारण

बजरंग सोनवणेंना विजयी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस करणार धमाल

  • मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवण्यासाठी व मनुवाद्याचा आवाज दाबून बहुजनाच्या हिताचे कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरकार येण्यासाठी बीड मध्ये बजरंग सोनवनेंना निवडून द्या ―कॉग्रेस नेते आशोक हिंगे,जुबेरभाई चाऊस

  • पाटोदा तालुक्यातुन महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जास्तीतजास्त मताची लिड देऊ― युवानेते उमर चाऊस, काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे

बीड (प्रतिनिधी): भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बीड जिल्हाच्या वतिने माजी खासदार रजणीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व बीड काँग्रेसचे नेते आशोक पाटील व आदित भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड लोकसभेची जागा विजयी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक केज येथे घेण्यात आली यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले नंतर उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मोदी सरकारने गेली पाच वर्षात आपली फसवणूक कशी केली सांगून बीडच्या विकासासाठी मला मतदान देऊन लोकसभेत जान्याची संधी द्यावि अशी विनंती केली यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष हिमाचलच्या प्रभारी व बीड जिल्ह्याच्या माजी खासदार रजणीताई पाटील यांनी मोदी सरकारवर टिका केली.अच्छे दिनच्या नावाखाली मोदी सरकारने बुरे दिन आनले पंधरा लाख देऊ म्हणणार्यानी साधे पंधरा रुपयही दिले नाहीत यामुळे फेकु सरकारला घरी बसवुन सर्व सामान्य गोरगोरिब जनतेच्या हिताचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला मतदान करुन देशाचे पंतप्रधान राहुल गांधी यांना करण्यासाठी बीड जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, मतदार बंधु भगिणीनी बजरंग सोनवणे यांना निवडून द्यावे असे आवाहान यावेळी करण्यात आले. यामुळे बजरंग सोनवणेंना निवडून आण्यासाठी बीड जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस करणार धमाल यावेळी बीड जिल्ह्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.