बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

महागाईच्या विरोधात काँग्रेसची बीडमध्ये निदर्शने ; मोदीजीनी दाखवलेले बुरे दीन बघवत नाहीत म्हणून डोळ्यावर काळी पट्टी बांधून आंदोलन केले – गणेश बजगुडे

बीड(नानासाहेब डिडूळ): अच्छे दिनचे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशवासीयांची मोठ्या प्रमाणात दिशाभुल केलेली असून प्रचंड प्रमाणात झालेल्या महागाई मुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेला बुरे दिन दाखवण्याचे काम या भाजपा सरकारने केलेले आहे व हे बुरे दिवस बघवत नाहीत म्हणून बीड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महागाईच्या विरोधात डोळ्यावर काळी पट्टी बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी बीड तालुका अध्यक्ष गणेश दादा बजगुडे म्हणले की, एकीकडे गेली दोन वर्षापासून कोरोनाचे संकट व बेरोजगारी ओढवलेली असतानाच पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य तेल यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मात्र दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. शेटजी भटजीचे हे भाजप सरकार जरी आच्छे दिनाच्या नावाने सत्तेत आलेले असेल तरी प्रत्यक्षात मात्र गोरगरीब सर्वसामान्यांचे आज बुरे दीन आल्याचे दिसत आहे म्हणून केंद्रातील भाजप सरकारने चालवलेली ही हुकूमशाही व गोरगरीब जनतेची होत आलेली पिळवणूक आता आम्हाला बघवत नाही म्हणून आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने डोळ्यावर काळी पट्टी बांधून महागाईच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करत आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, खा. रजनीताई पाटील, नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात महागाईच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून माजी मंत्री अशोकराव पाटील, युवा नेते आदित्य पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जेष्ठ नेते नवनाथ थोटे, भास्कर केदार, बीड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, काँग्रेस सोशल मीडियाचे चरणसिंग ठाकूर, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे विष्णु मस्के, ओबीसी सेलचे गणेश राऊत, असंघटित कामगार सेलचे संतोष निकाळजे, लीगल सेलचे ॲड. गणेश करांडे, बीड शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाशमी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, अशोक जोगदंड, सिराज पटेल, बबलु शेख, आलम खान, भागवत बजगुडे, दीपक बजगुडे, बालाजी झोडगे, श्रीमंत घोडके, बंटी महाकुंडे, अशोक घल्लाळ, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Back to top button