सोयगाव दि.०९(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): कवली(ता.सोयगाव)परिसरात भूगर्भात क्षारयुक्त पाणी असल्याने या पाण्याने गावभर नागरिकांना किडनीचे विकार जडले असल्याने गावभर घबराट पसरली आहे.निवडणुकांच्या धामधुमीत प्रशासनाकडून या गावाकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांचे स्थलांतर सुरु झाले आहे.दरम्यान या विकारावर उपचार होत नसल्याने अनेकांना प्राण गमाविण्याच्घी वेळ आली आहे.
कवली ता.सोयगाव गावाला पुरवठा होणाऱ्या यंत्रणेतून क्षारयुक्त पाणी पिण्यात येत असल्याने आख्खे गाव किडनीच्या त्रासाने बाधित झाले आहे,महिनाभरापासून हा प्रकार उघडकीस आल्यावरही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांची घबराट वाढली आहे.दरम्यान भूजल सर्वेक्षण विभागाने या गावपरिसरातील भूगर्भातून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असता,या भागात भूगर्भातच पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने तालुका प्रशासनाने दिला असतांनाही यावर अद्याप उपाय योजना हाती घेण्यात आलेली नाही.किडनीच्या त्रासाने बाधित किमान शंभराच्या वर रुग्ण अद्यापही खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे चिंध साळवे यांनी सांगितले.या प्रकारामुळे ग्रामस्थांनी गावाबाहेर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याने ऐन निवडणुकांच्या काळात गाव ओस पडत आहे.