राष्ट्रवादीच्या डोअर-टु-डोअर प्रचार रॅलीस मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अंबाजोगाई : 39-बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस (आय),शेकाप, स्वाभीमानी शेतकरी संघटना,पीआरपी (कवाडे गट),मानवी हक्क अभियान व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ केज विधानसभा मतदार संघातील अंबाजोगाई अंबाजोगाई शहरात मंगळवार,दि.9 एप्रिल रोजी शहरातील प्रभाग क्रमांक 1, 8, 10 व 13 मध्ये सारिकाताई सोनवणे व माजी आ.पृथ्विराज साठे यांची प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीस अंबाजोगाई शहर वासियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी गेल्या चार दिवसांत अंबाजोगाई शहर व तालुक्यात झंजावाती प्रचार दौरा पुर्ण केला असून व राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विकासाच्या मुद्यावर मत देण्याचे आवाहन केले आहे. मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी जि.प.सदस्या सारिकाताई सोनवणे व माजी आ.पृथ्विराज साठे यांनी शहरात चार प्रभागात सकाळी 8 वाजता प्रचार रॅली काढली.प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी प्रचार रॅलीचे नागरिकांनी उत्स्फुर्त स्वागत केले.तत्पुर्वी सकाळी 8 वाजता नगरसेविका शेख शमिम शेख रहिम भाभी यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्रित जमले व तेथून चार प्रभागात ते प्रचारासाठी गेले.ग्रामीण व शहरी भागात भाजपविरोधी लाट आहे ती आता दिसून येत आहे.मराठा,धनगर, लिंगायत,मुस्लीम या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याबद्दल तसेच शेतकर्यांना आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल,कर्जमाफी न केल्याबद्दल,वाढती बेरोजगारी,महागाई या सर्व प्रश्नांची सोडवणूक न करता आल्याने भाजपावर शहरी व ग्रामिण जनता नाराज आहे.अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येक गावात माजी आमदार पृथ्विराज साठे यांच्या प्रचार सभा व कॉर्नर बैठकांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता या निवडणुकीत निश्चित परिवर्तन होईल.असा विश्वास आता मतदारच जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. मंगळवारी काढलेल्या प्रचार रॅलीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित कार्यकर्ते व नेत्यांनी प्रचार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजित लोमटे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,गटनेत्या सौ. राजश्री अशोक मोदी, नगरसेवक शेख रहिम, नगरसेवक अनिस अन्सारी,नगरसेवक इस्माईल गवळी, नगरसेवक सय्यद असदभाई,नगरसेवक शमशोद्दीन काझी, नगरसेवक मिलींद बाबजे,नगरसेवक असेफोद्दीन खतीब, माजी नगरसेवक गौतम सरवदे,बन्सीअण्णा जोगदंड,माजी नगरसेविका बिलकीस कच्छी,शेख रौफ, अंजलीताई पाटील, सविताताई मेंढके,दत्ता सरवदे,अनिल पिंपळे,शेख जावेद शेख खलील,श्रीरंग चौधरी, पंकज रापतवार, रणजित पवार,अविनाश उगले,सोमनाथ धोञे, वसंत उदार,हमीद चौधरी,जनक गडकर, सदाशिव सोनवणे, इरफान पठाण, आम्रपाली सरवदे,मुनीर कुरेशी,शेख नय्युमभाई, शेख अकबर,रमेश कदम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रशांतनगरमध्ये नगरसेवक बबनराव लोमटे यांचा डोअर-टु-डोअर प्रचार
राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी शहरातील प्रशांतनगर भागात पृथ्वीराज साठे व बबनराव लोमटे यांच्या नेर्तृत्वाखाली डोअर टु डोअर प्रचार करण्यात आला.यावेळी अनिल पसारकर,शेख जावेद शेख खलील,वैभव लोमटे आदींसहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.